Mumbai Local Train : लोकलमधून प्रवास करतांना पाससोबत आता ओळखपत्रही अनिवार्य

रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाविरोधात प्रवाशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, हा नाहक त्रास देण्याचा प्रकार असल्याचा आरोप होत आहे.

84
Mumbai Local Train : लोकलमधून प्रवास करतांना पाससोबत आता ओळखपत्रही अनिवार्य
Mumbai Local Train : लोकलमधून प्रवास करतांना पाससोबत आता ओळखपत्रही अनिवार्य

बनावट युटीएस आणि लोकल पासच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे कारवाई करताना रेल्वे प्रशासनाला नाहक गैरसोय होत आहे. याच गोष्टींना आळा घालण्यासाठी काही अटी घालण्यात आला आहे.मुंबईत लोकल प्रवासादरम्यान (Mumbai Local Train) पासधारकांना आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना किंवा मतदान कार्ड यापैकी एक मूळ ओळखपत्र जवळ बाळगणे बंधनकारक केले आहे. मात्र रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाविरोधात प्रवाशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, हा नाहक त्रास देण्याचा प्रकार असल्याचा आरोप होत आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने यूटीएस ॲपद्वारे ऑनलाईन तिकीट/ पासची सुविधा दिली आहे; परंतु फुकट्या प्रवाशांनी यावर शक्कल लढवत सॉफ्टवेअरच्या साह्याने बनावट पास तयार केल्याचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच पासधारकांची नोंद राखण्यासाठी मध्य रेल्वेने नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे.
मुंबईत मध्य-पश्चिम रेल्वे मिळून दररोज तीन हजारहून अधिक लोकल फेऱ्या होतात. यामधून दैनंदिन ७५ लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. विशेष म्हणजे यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवासासाठी जुना पास दाखवून नवीन पास यापूर्वी सहज उपलब्ध होत होता.

(हेही वाचा : Lift Accident : पुन्हा एकदा लिफ्ट कोसळून चार कामगारांचा जागीच मृत्यू)

पासच्या नूतनीकरणासाठी आता प्रत्यक्ष ओळखपत्राची गरज
पासचे नूतनीकरण करण्यासाठी आधार कार्ड किंवा इतरपैकी एक ओळखपत्र दाखवणे अनिवार्य केले आहे. याच्याच पुढे जात ज्या ओळखपत्राच्या आधारावरून प्रवाशांनी पास काढले ते ओळखपत्र प्रवास करताना जवळ बाळगणे आवश्यक आहे. तसेच तिकीट तपासणीदरम्यान टीसीने मूळ ओळखपत्राची मागणी केल्यास मूळ प्रत किंवा ‘डीजी लॉकर’मधील ई-ओळखपत्र दाखवणे बंधनकारक केले आहे. त्यात मोबाईलमधील फोटो कॉपी चालणार नाही. ओळखपत्र नसल्यास संबंधित प्रवाशावर दंडात्मक कारवाई होऊ शकते, असे रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.