Lift Accident : पुन्हा एकदा लिफ्ट कोसळून चार कामगारांचा जागीच मृत्यू

इमारतीचं बांधकाम सुरु असताना घडला अपघात

130
Lift Accident : पुन्हा एकदा लिफ्ट कोसळून चार कामगारांचा जागीच मृत्यू

काही दिवसांपूर्वी ठाणे शहरात एका इमारतीची लिफ्ट कोसळून अपघात (Lift Accident) झाला होता. त्यानंतर आता नोएडा मध्ये याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नोएडामध्ये ग्रेटरच्या बिसरख कोतवाली परिरातील आम्रपाली इमारतीमध्ये लिफ्ट कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

अधिक माहितीनुसार, आम्रपाली ग्रुपच्या एका इमारतीचे (Lift Accident) काम सुरू होते. या इमारतीमधील लिफ्टचा अपघात होऊन यामध्ये चार कामगारांचा मृत्यू झाला असून जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.

(हेही वाचा – LIC Dividend : एलआयसीने सरकारला दिला १,८३१ कोटी रुपयांचा लाभांश )

हा अपघात घडला त्यावेळी लिफ्टमध्ये (Lift Accident) बांधकामसाठीचे साहित्य आणि कामगार उपस्थित होते. मृत कामगारांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. सर्व मृत कामगार हे बिहारच्या किशनपूरच्या टभका गावात राहणारे होते.

ठाण्यातल्या घटनेची पुनरावृत्ती

काही दिवसांपूर्वी ठाण्याच्या बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या 40 मजली इमारतीवरून (Lift Accident) लिफ्ट कोसळून सात कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर काही कामगार गंभीर जखमी झाले होते. नुकतंच बांधकाम पूर्ण झालेल्या या इमारतीच्या छतावर वॉटरप्रुफिंगचे काम सुरू होतं. वॉटरप्रुफिंगचं हे काम संपवून कामगार खाली येत असताना हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी (Lift Accident) दाखल झाले आणि तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.