Baby Patankar : ड्रग्ज माफिया क्वीन बेबी पाटणकर विरुद्ध वरळीत गुन्हा दाखल

बेबी पाटणकर आणि परशुराम रामकिशन मुंढे यांच्याविरुद्ध कलम ४२० आणि ३४ नुसार वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे

24
Baby Patankar : ड्रग्स माफिया क्वीन बेबी पाटणकर विरुद्ध वरळीत गुन्हा दाखल
Baby Patankar : ड्रग्स माफिया क्वीन बेबी पाटणकर विरुद्ध वरळीत गुन्हा दाखल
ड्रग्ज माफिया क्वीन (Baby Patankar) म्हणून ओळखली जाणारी शशिकला पाटणकर उर्फ बेबी पाटणकर ही फसवणुकीच्या एका प्रकरणात पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या रडारवर आली आहे. बेबी पाटणकर हिने आपल्या एका सहकाऱ्याच्या मदतीने एका व्यवसायिकांची सुमारे २ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात बेबी पाटणकर आणि तिच्या सहकाऱ्या विरुद्ध फसवणुकीचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, किरीट सुरेश चव्हाण (६१) असे तक्रारदाराचे नाव असून तो रुनिचा फ्रेंच फॉरवर्डचा मालक आहे. चव्हाण यांची कंपनी कस्टम क्लिअरन्सचे काम देते. चव्हाण यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे की, त्यांनी सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, त्यासाठी त्यांनी आपल्या काही मित्रांना या क्षेत्राशी संबंधित लोकांना संपर्क करण्यास सांगितले होते.
ऑक्टोबर २०२१ मध्ये देवकुमार रॉय नावाच्या चव्हाण यांच्या ओळखीच्या व्यक्तीने त्यांची सुनीता चौधरी नावाच्या महिलेशी ओळख करून दिली. चौधरी यांनी चव्हाण यांची परशुराम रामकिशन मुंढे नावाच्या व्यक्तीशी ओळख करून दिली. मुंढे यांनी चव्हाण यांना सांगितले की ते मेसर्स आरआरएम गोल्ड ट्रेडिंग कंपनीचे संचालक आहेत आणि त्यांची कंपनी सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करते.

मुंढे याने चव्हाण यांना वरळी नाक्याजवळील भिवंडीवाला चाळीतील पहिल्या मजल्यावरील एका खोलीत सोने दाखवण्यासाठी बोलावले आणि तेथे शशिकला रमेश पाटणकर उर्फ ​​बेबी (Baby Patankar) यांच्याशी ओळख करून दिली. बेबीकडे पाच किलो सोने असल्याचे मुंढे यांनी चव्हाण यांना सांगितले. पाटणकर यांना गेल्या पाच वर्षांपासून ओळखत असल्याचे मुंढे म्हणाले.(हेही वाचा-Novak Djokovic’s Next Target : अमेरिकन ओपन विजेतेपदानंतर आता जोकोविचला वेध पॅरिस ऑलिम्पिकचे)

त्यांनी चव्हाण यांना तीन किलो सोन्यासाठी १कोटी २७लाख  रुपये दिले आणि दुसऱ्या दिवशी ते सोने घेण्यासाठी गेले असता बेबीने सांगितले की, तुम्ही फक्त तीन किलो सोन्याचे पैसे दिले आहेत आणि उरलेल्या दोन किलोसाठी ८७ लाख रुपये द्या तेव्हाच, मी सोने देईन. चव्हाण यांनी दुसऱ्या दिवशी ७०  लाख रुपयांची व्यवस्था केली आणि पैसे घेऊन ते  वरळीतील भिवंडीवाला चाळीत आला. चव्हाण यांनी हे पैसे बेबीला दिले. हे पैसे घेऊन बेबी म्हणाली, थोडा वेळ थांबा, मी सोने घेऊन येते, बराच वेळ  चव्हाण आणि मुंढे हे त्या ठिकाणी थांबले परंतु बेबी पाटणकर ही सोने घेऊन आलीच नाही. दरम्यान मुंढे यांनी बेबीला फोन केला असता ती म्हणाली की उद्या झवेरी बाजार येथे ये, मी तुला तेथे सोने देईन. दुसऱ्या दिवशी बेबीने दिलेल्या वेळेनुसार चव्हाण आणि मुंढे झवेरी बाजारला पोहोचले पण ती आली नाही.
त्यानंतर मुंढेने चव्हाण यांना सांगितले की, बेबी पाटणकर (Baby Patankar) ही अमली पदार्थांचा व्यवसाय करत असून तिच्यावर मुंबईतील अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. चव्हाण यांनी मुंढे यांना दिलेले पैसे परत मिळावेत यासाठी अनेकवेळा विचारणा केली, मात्र मुंढे यांनी बेबी पैसे देत नसल्याचे सांगून पैशांचा विषय सोडून द्या असे सांगितले. पैसे न मिळाल्याने चव्हाण यांनी मुंबई गुन्हे शाखेकडे धाव घेऊन तक्रार केली. चव्हाण यांची तक्रार आणि त्यांनी दिलेले पुरावे तपासल्यानंतर गुन्हे शाखेने शशिकला उर्फ ​​बेबी पाटणकर (Baby Patankar) आणि परशुराम रामकिशन मुंढे यांच्याविरुद्ध कलम ४२० आणि ३४ नुसार वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.