Mumbai Local : महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेची टॉक-बॅक सिस्टम

मार्च २०२४ पर्यंत सर्व लोकल मध्ये ही यंत्रणा बसवणार

119
Mumbai Local : महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेची टॉक-बॅक सिस्टम
Mumbai Local : महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेची टॉक-बॅक सिस्टम

मुंबई लोकल Mumbai Local मध्ये अनेकवेळा प्रवास करताना महिलांवर अत्याचाराचे प्रसंग घडल्याच्या घटना घडल्या आहेत.मुंबईच्या लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत. पण यावर उपाय म्हणून रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.लोकल ट्रेनच्या महिला डब्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुधारणा सुरू करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये टॉक-बॅक सिस्टम बसवण्यात आली आहे. यामुळे महिलांना कुठल्याही संकटाच्या प्रसंगी त्यांना मदत हवी असल्यास पुश बटण दाबून थेट रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधू शकतील.

 लोकलमध्ये Mumbai Local महिला डब्यांमध्ये अनेकदा वाद विवाद  झाल्याची  किंवा पुरुष प्रवासी  चढल्याच्या घटना घडल्या आहेत. इतकंच नाहीतर रात्रीच्या वेळी लोकलमधून प्रवास करतानाही महिलांच्या मनात भीती असते. यामुळे आता रेल्वेकडून महिला प्रवाशांच्या डब्यामध्ये टॉकबॅक सिस्टम लावण्यात आली आहे.
यामुळे अडचणीच्या काळात महिला अगदी सहजरित्या रेल्वे प्रशासनाशी संवाद साधू शकतात. महिला प्रवाशांना आणीबाणीच्या वेळी पुश बटण सक्रिय करून ट्रेन प्रशासनाशी संवाद साधता येतो. एकूण १५१ ईएमयू रॅकपैकी, ही प्रणाली ८० रॅकमध्ये यशस्वीरित्या बसवण्यात आली आहे. तर उर्वरित युनिट्समध्ये मार्च २०२४ पर्यंत टॉकबॅक सिस्टम बसण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही पहा – 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.