Mahalakshmi Express: मुंबई-कोल्हापूर, मुंबई-नागपूर प्रवास अधिक सुरक्षित होणार; वाचा कारण

महालक्ष्मी सेवाग्रामला अपघातरोधक डबे बसवण्यात येणार आहेत.

236
Mahalakshmi Express: मुंबई-कोल्हापूर, मुंबई-नागपूर प्रवास अधिक सुरक्षित होणार; वाचा कारण
Mahalakshmi Express: मुंबई-कोल्हापूर, मुंबई-नागपूर प्रवास अधिक सुरक्षित होणार; वाचा कारण

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून नागपूर, कोल्हापूरसाठीचा रेल्वे प्रवास आता पूर्वीपेक्षा अधिक सुखकर आणि सुरक्षित होणार आहे. सीएसएमटी-नागपूर सेवाग्राम आणि सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस (Mahalakshmi Express) लिंक हॉफमॅन बुश (एलएचबी) म्हणजेच अपराधरोधक डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२५ मेपासून नागपूर-मुंबई सेवाग्राम एलएचबी डब्यांसह धावणार आहे. मुंबईहून सेवाग्रामचा परतीचा प्रवास (१२१३९) २६ मेपासून सुरू होणार आहे. सध्या ही गाडी आयसीएफ डब्यांसह धावत आहे. सेवाग्रामसाठी दोन २२ डब्यांची एलएचबी रेल धावत्या ठेवण्यात येणार आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

२ द्वितीय वातानुकूलित, १२ तृतीय इकॉनॉमी, ४ शयनयान, गार्डस ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅनसह ३ द्वितीय श्रेणीचे डबे, अशी २२ डब्यांची संरचना असणार आहे. गाडी क्रमांक १७४१२ छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर)-सीएसएमटी एक्सप्रेस महालक्ष्मी (CSMT Express Mahalakshmi) नुकतीच एलएचबी डब्यांसह रवाना झाली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्हिडियो कॉन्फरन्सच्या मध्यमाने एक्सप्रेसला झेंडा दाखवत गाडी रवाना केली.

(हेही वाचा – Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ‘परीक्षा पे चर्चा’, जगभरातील २ कोटींहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी केली नोंदणी )

एलएचबी म्हणजे काय ? (अपघातरोधक डबे)
जर्मनीच्या लिंक हॉफमॅन बुशने (Link Hoffmann Busch) (एलएचबी) रेल्वे डबा विकसित केला आहे. कपूरथळा, चेन्नई आणि रायबरेली येथील रेल्वे कारखान्यात एलएचबी डब्यांची बांधणी केली जाते. आयसीएफ डब्यांच्या तुलनेत हलके, वेगाने धावण्याची क्षमता, कमी देखभाल खर्च, अपघातरोधक आणि उत्तम वातानुकूलित यंत्रणा ही एलएचबी डब्यांची वैशिष्ट्ये आहेत. यामुळे देशातील सर्व रेल्वेगाड्यांतील आयसीएफ डबे मोडीत काढून त्या जागी एलएचबी डबे जोडण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.