Dadar hawkers plaza market : दादरच्या हॉकर्स प्लाझाला टाळे लावण्याची आली वेळ, कारण काय ते जाणून घ्या

राज्यात शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रयत्नाने सेनापती बापट मार्गावरील फेरीवाल्यांना हटवून त्यांचे पुनवर्सन त्याच ठिकाणी हॉकर्स प्लाझाची इमारत बांधून केले. मात्र, रस्त्यावर जो धंदा व्हायचा तो धंदा या हॉकर्स प्लाझामध्ये होत नाही, त्यामुळे गाळेधारकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असे.

7009
Dadar hawkers plaza market : दादरच्या हॉकर्स प्लाझाला टाळे लावण्याची आली वेळ, कारण काय ते जाणून घ्या

सचिन धानजी, मुंबई

दादरच्या हॉकर्स प्लाझाला (Dadar hawkers plaza market) टाळे लावण्याची वेळ आता आली आहे. आधीच या हॉकर्स प्लाझातील गाळेधारकांचा व्यवसाय होत नाही म्हणून ते त्रस्त आहेत, त्यात आता प्लाझाकडे येणारा मार्गच एका विकासकाने बंद करून टाकल्याने जो काही ग्राहक यायचा तोही बंद झाला आहे. रस्ता बंद असल्याने हॉकर्स प्लाझात येणाऱ्यांची संख्या घटल्याने येथील गाळेधारकांचा खर्च निघत नाही. “महापालिकेने रस्त्यावरुन आम्हाला या मार्केटमध्ये आणले, पण या मार्केटचा रस्ता विकासकाकडून बंद केल्यानंतरही महापापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना हा मार्ग खुला करण्यासाठी कोणताही प्रयत्न केला जात नाही. त्यामुळे या मार्केटला टाळे ठोकून आम्ही पुन्हा रस्त्यावर जावून बसायचे हीच महापालिकेची इच्छा आहे का” असा संतप्त सवाल येथील गाळेधारकांकडून केला जात आहे.

(हेही वाचा – Thackeray group criticizes Nitish Kumar : नितीश कुमार यांच्यावर ठाकरे गटाची सडकून टीका; म्हणाले …)

गाळेधारकांसमोर मोठी समस्या उभी राहिली आहे –

राज्यात शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रयत्नाने सेनापती बापट मार्गावरील फेरीवाल्यांना हटवून त्यांचे पुनवर्सन त्याच ठिकाणी हॉकर्स प्लाझाची (Dadar hawkers plaza market) इमारत बांधून केले. मात्र, रस्त्यावर जो धंदा व्हायचा तो धंदा या हॉकर्स प्लाझामध्ये होत नाही, त्यामुळे गाळेधारकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असे. या हॉकर्स प्लाझाबाबत महापालिकेने कोणत्याही प्रकारची जाहिरात करत लोकांना याची कल्पना दिली नाही की याकडे जाणारे रस्ते चांगले बनवले. त्यामुळे सकाळी याठिकाणी होणाऱ्या भाजीच्या व्यवसायामुळे या मार्केटकडे कुणाचे लक्षच नाही तसेच पावसाळ्यात याठिकाणी असणारी दलदल यामुळे तर या परिसरात कुणी फिरकत नाही. त्यामुळे आधीच व्यवसाय होत नसल्याने त्रस्त असलेल्या गाळेधारकांसमोर आणखी एक मोठी समस्या उभी राहिली आहे.

New Project 2024 01 29T114807.400

(हेही वाचा – Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ‘परीक्षा पे चर्चा’, जगभरातील २ कोटींहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी केली नोंदणी)

हॉकर्स प्लाझाकडे येणारा मार्ग विकासकाने बंद करून टाकला

हॉकर्स प्लाझाकडे (Dadar hawkers plaza market) जाणाऱ्यासाठी शिवाजी मंदिरा समोरील आणि केंब्रीज दुकानाच्या शेजारुन जे के सावंत मार्गावरून तसेच सेनापती बापट मार्गावरुन दोन प्रवेश मार्ग आहेत. जे के सावंत मार्ग आणि सेनापती बापट मार्ग यांना जोडणारा मार्ग हॉकर्स प्लाझाजवळून जातो. त्यामुळे या हॉकर्स प्लाझाकडे येणारे ८० टक्के ग्राहक जे के सावंत मार्गावरून यायचे. परंतु मागील काही महिन्यांपासून येथील राऊत वाडी आणि नर्मदा चाळ यांच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले. या मार्गावरील या दोन वाडीच्या पुनर्विकासात या हॉकर्स प्लाझाकडे येणारा मार्ग विकासकाने बंद करून टाकला. या मार्गावर कोणतेही बांधकाम नसतानाही केवळ विकासकामाने हा मार्ग बंद केल्याने हॉकर्स प्लाझाकडे येणाऱ्या ग्राहकांचा आणि नागरिकांचा कल कमी झाला असून याला महापालिकेच्या आणि एसआरएच्या काही अधिकाऱ्यांची साथ असल्याने महापालकेचा बंद केलेला गेट आजतागायत खुला केला जात नाही,असे येथील गाळेधारकांचे म्हणणे आहे.

New Project 2024 01 29T114919.050

(हेही वाचा – Shantanu Thakur : येत्या आठ दिवसांमध्ये CAA कायदा लागू होईल)

महापालिकेचे दुर्लक्ष –

हॉकर्स प्लाझातील (Dadar hawkers plaza market) तीन मजल्यांपर्यंत कपड्यांच्या व्यापारांचे सुमारे ८०० ते ९०० गाळे यामध्ये आहेत. वारंवार महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरही ते याकडे लक्ष देत नाही. आम्ही महापालिकेचे परवानाधारक आहोत. महापालिकेला अधिकृत शुल्क भरुन व्यवसाय करतो. या मार्केटची सुरक्षा आणि याठिकाणी गाळेधारकांचा व्यवसाय व्हावा ही महापालिकेची जबाबदारी असतानाही अधिकारी जाणीव पूर्वक हा जे के सावंत मार्गावरुन येणारा रस्त्या तथा गेट विकासकाला खुला करून द्यायला भाग पाडत नाही. यावरून महापालिकेला तसेच एसआरएच्या अधिकाऱ्यांना महापालिकेच्या मार्केटची चिंता नाही,पण विकासकाची आहे असेच दिसते, अशा शब्दात हॉकर्स प्लाझा क्लॉथ सेवा संस्था, न्यू जनता मार्केट व्यापारी संघ, जनता क्लॉथ मार्केटच्या असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

(हेही वाचा – Mahalakshmi Express: मुंबई-कोल्हापूर, मुंबई-नागपूर प्रवास अधिक सुरक्षित होणार; वाचा कारण)

पुनर्विकासाला आमचा विरोध नाही –

विशेष म्हणजे जो रस्ता विकासकाने बंद केला आहे, ती जागा मंडईसाठी (Dadar hawkers plaza market) आरक्षित असून महापालिकेच्या मालकीची आहे. याबाबत बाजार विभागाच्या सहायक आयुक्तांनीही आपली यासाठी कोणतीही एनओसी नसल्याचे म्हटले, तर मालमत्ता विभागाच्या सहायक आयुक्तांनीही या जागेवर महापालिकेने पुनिर्वकासाला परवानगी दिली असली तरी हा रस्ता बंद करण्याची कोणतीही परवानगी दिली नसल्याचेही असोशिएशनला सांगितले आहे. त्यामुळे जर हा रस्ता बंद करण्यास परवानगी नसताना बेकायदेशी हा रस्ता बंद केल्याबददल महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई नको, पण किमान हा मार्ग तर खुला करून द्यावा हीच आमची मागणी असल्याचे असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या चाळीच्या पुनर्विकासाला आमचा विरोध नाही, त्यांचा प्रकल्प विकासकाने नियोजित वेळेत पूर्ण करावा, पण यासाठी मार्केटकडे येणारा सार्वजनिक रस्ता बंद करून आमच्या पोटावर लाथ मारण्याचा प्रयत्न करत का केला जातो असा सवाल त्यांनी महापालिकेला केला आहे. आमच्या पोटापाण्याचाच प्रश्न निर्माण झाल्याने आता आम्हाला तोंड उघडल्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. हा रस्ता खुला न झाल्यास भविष्यात आम्हाला या हॉकर्स प्लाझाला टाळे ठोकून रस्त्यावर जाण्याची वेळ येईल आणि हेच काही विकासक आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या डोक्यात तर नाही ना अशी भीतीही या पदाधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. (Dadar hawkers plaza market)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.