Shantanu Thakur : येत्या आठ दिवसांमध्ये CAA कायदा लागू होईल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही खूप वेळा सांगितले की, नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा 'देशाचा कायदा' आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप देखील अमित शहा यांनी केला होता.

322
Shantanu Thakur : येत्या आठ दिवसांमध्ये CAA कायदा लागू होईल

केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर (Shantanu Thakur) यांनी एक मोठं विधान केलं आहे. देशात लवकरच म्हणजेच येत्या आठ दिवसांमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू होईल असा दावा मंत्री शंतनू ठाकूर यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले शंतनू ठाकूर ?

पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगण्यातील काकद्वीप येथे एका जाहीर सभेत बोलताना केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर (Shantanu Thakur) म्हणाले, “मी आज तुमच्यासमोर गॅरंटी देतो की येत्या आठ दिवसांत सीएए केवळ बंगालमध्येच नाही तर संपूर्ण देशात लागू केला जाईल.”

(हेही वाचा – Thackeray group criticizes Nitish Kumar : नितीश कुमार यांच्यावर ठाकरे गटाची सडकून टीका; म्हणाले …)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही खूप वेळा सांगितले की, नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा ‘देशाचा कायदा’ आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप देखील अमित शहा यांनी केला होता.

दरम्यान जानेवारी २०२४ च्या पहिल्या आठवड्यात सरकारी सूत्रांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच सीएएचे नियम अधिसूचित केले जातील.

(हेही वाचा –  Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ‘परीक्षा पे चर्चा’, जगभरातील २ कोटींहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी केली नोंदणी)

काय आहे नागरिकत्व दुरुस्ती कायदा ?

सीएए विधेयकाला (Citizenship Amendment Act) संसदेने डिसेंबर २०१९ मध्ये मंजुरी दिली होती. १२ डिसेंबर २०१९ रोजी त्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली. या विधेयकात पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून धार्मिक छळाला बळी पडलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चनांना भारतीय नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे. यामधून मुस्लिमांना वगळण्यात आले आहे.(Shantanu Thakur)

(हेही वाचा – Kutch Earthquake : कच्छमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के)

हा कायदा मंजूर झाल्यानंतर लगेचच देशभरात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सीएएचे नियम आता तयार झाले आहेत आणि ऑनलाइन पोर्टलही तयार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असेल आणि अर्जदार त्यांच्या मोबाईल फोनवरूनही अर्ज करू शकतात, असे सूत्रांनी सांगितले. (Shantanu Thakur)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.