आयबीच्या गुप्त अहवालानंतर अंबानींच्या सुरक्षेत वाढ, काय आहे कारण?

107

रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. इंटेलिजन्स ब्युरो(आयबी)ने सादर केलेल्या अहवालात मुकेश अंबानी यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अंबानी यांची सुरक्षा झेडवरुन झेड प्लस करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्याच्या प्रकरणानंतर अंबानी कुटुंबीयांची सुरक्षा वाढवण्याचा विचार करण्यात येत होता. पेमेंट बेसिसवर अंबानी यांची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः कारमध्ये 6 एअरबॅग्स सक्तीच्या, नितीन गडकरींची घोषणा! ‘या’ तारखेपासून अंमलबजावणी)

कशी असते सुरक्षा?

झेड प्लस सुरक्षेत एकूण 58 कमांडो तैनात असतात. त्याचबरोबर 10 सशस्त्र स्टॅटिक गार्ड,6 पीएसओ,24 जवान, चोवीस तास 2 एस्कॉर्ट,5 वॉचर्स दोन शिफ्टमध्ये तैनात करण्यात येतात. तसेच एक पोलिस निरीक्षक किंवा उपनिरीक्षक देखील प्रभारी म्हणून सेवेत तैनात असतात.

सर्वोच्च न्यायालयाने दिला निर्णय

अंबानी कुटुंबीयांना सुरक्षा देण्याविरोधात त्रिपुरा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावेळी त्रिपुरा उच्च न्यायालयाने मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला सुरक्षा देण्यासाठी लागणारी कारणे केंद्र सरकारकडे मागितली होती. ही कारणे गुप्त असल्याने केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 22 जुलै रोजी मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मुंबईत सुरक्षा देण्याचा निर्णय दिला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.