एसटी धावली, उत्पन्नात कोटीच्या घरात पोहचली!

103

मागील अडीच वर्षे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीवर एकापाठोपाठ एक संकटे आली. त्यात कोरोना आणि एसटी कामगारांच्या संपाचा समावेश आहे. यामुळे एसटीची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळली होती. महामंडळाचा महसूल दिवसाकाठी लाखाच्या घरात आला होता. मात्र २२ एप्रिलपासून एसटी पूर्ण क्षमतेने धावू लागली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्याचा फायदा एसटीला होऊ लागला आहे. त्याचा परिणाम म्हणून आता एसटीचा महसूल दिवसाकाठी कोटीच्या घरात गेला आहे.

संप मिटल्यावर उत्पन्नात वाढ 

कोरोनाच्या कालखंडात २ वर्षे लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यामुळे एसटीच्या बसगाड्या बंदच होत्या. त्यानंतर नोव्हेंबर २०२१ पासून एसटीच्या कामगारांनी संप सुरु केला. हा संप तब्बल ४ महिने चालला. त्यामुळेही एसटीचे अतोनात नुकसान झाले. एसटीचे प्रचंड नुकसान झाले. राज्य सरकारने ७ वेळा संपकरी कामगारांना कामावर हजर होण्यासाठी विनंती केली. मात्र तरीही कामगार संपावर ठाम राहिले. त्यामुळे अखेरीस मुंबई उच्च न्यायालयाने एसटीच्या कामगारांना २२ एप्रिल हा अल्टिमेटम दिला. त्यानंतर जे कामगार उपस्थित राहणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यास सरकारला परवानगी दिली. त्यामुळे संपकरी कामगार पुन्हा कामावर रुजू होऊ लागेल. २२ एप्रिलपासून एसटी सर्व क्षमतेने धावू लागली. तेव्हापासून ५ दिवसांत एकूण ६५ कोटी ६३ लाख रुपये एसटीचा महसूल जमा झाला.

(हेही वाचा सरकारी मेगाभरती! अडीच लाख रिक्त पदे भरणार)

५ दिवसांतील महसूल 

  • २२ एप्रिल – ११ कोटी ८५.२१ २३
  • एप्रिल – १२ कोटी ६९.३८
  • २४ एप्रिल – १३ कोटी १५.०५
  • २५ एप्रिल – १४ कोटी २७.५१
  • २६ एप्रिल – १३ कोटी ६६.११
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.