Monsoon Update : बाप्पाला निरोप देण्यासाठी पाऊसही सज्ज; मुंबईसह ३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

105
Monsoon Update : बाप्पाला निरोप देण्यासाठी पाऊसही सज्ज; मुंबईसह ३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

आज म्हणजेच गुरुवार २८ सप्टेंबर रोजी आपला लाडका बाप्पा सर्वांचा निरोप घेणार आहे. अशातच त्याला निरोप देण्यासाठी (Monsoon Update) पाऊस देखील सज्ज झाला आहे. हवामान खात्याने आज मुंबईसह ३ जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा दिला आहे. हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस

मुंबईत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची (Monsoon Update) शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज आहे. दरम्यान अहमदनगर, औरंगाबाद, सातारा, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. बीड, परभणी, सोलापूर, जालना आणि हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

(हेही वाचा – Asian Games 2023 : एमबीबीएस अभ्यासक्रम सोडून ती नेमबाजीत आली, सिफ्त कौरचा सुवर्ण जिंकण्यापर्यंतचा प्रवास)

राज्यासह तामिळनाडूमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Monsoon Update) पडण्याची शक्यता आहे. तर, आंध्रप्रदेशसह केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मान्सूनच्या परतीचा प्रवास…

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार २६ सप्टेंबर पासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला (Monsoon Update) सुरुवात होणार असून, उत्तर भारतापासून याची सुरुवात होणार आहे. तसेच राजस्थानच्या काही भागांतून नैऋत्य मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होणार आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमनच उशिरा झाल्यामुळे त्याच्या परतीचा प्रवासही उशिराने म्हणजेच १० ऑक्टोबरनंतर सुरु होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.