राज्यात पावसाचा जोर वाढला तर; हिमाचल प्रदेशात ‘ढगफुटी’ आणि उत्तराखंडमध्ये ‘भूस्खलनाने’ नागरिक हैराण

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील ४८ तासांत देशातील विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

230
राज्यात पावसाचा जोर वाढला तर; हिमाचल प्रदेशात 'ढगफुटी' आणि उत्तराखंडमध्ये 'भूस्खलाने' नागरिक हैराण

बिपरजॉय चक्रीवादळामुळे यावर्षी मान्सून लांबला होता. अखेर आता देशात सर्वत्र मान्सूनला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील पावसाने जोर धरला आहे. मात्र पहिल्याच पावसात मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचले असून काही ठिकाणी दुर्घटना घडली आहे. अशातच हिमाचल प्रदेशात ढगफुटी तर उत्तराखंडमध्ये भूस्खलाने नागरिक हैराण झाले आहेत.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट आणि हिमाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पहिल्याच पावसानंतर मुंबई, दिल्ली सारख्या मोठ्या शहरांमध्येही पाणी साचलं आहे.

अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस

सलग गेल्या दोन दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील ४८ तासांत देशातील विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी सुरु असून या भागात हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

(हेही वाचा – विद्याविहार इमारत दुर्घटना : २० तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू)

उत्तराखंडच्या अनेक भागात मुसळधार पाऊस

हरिद्वारमध्येही सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडत आहे. शहरातील अनेक भागांतून पाणी तुंबण्याची समस्या समोर आली आहे. काही लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे. प्रशासनाकडून ठिकठिकाणी सर्वेक्षण करण्यात येत आहे. उत्तराखंडच्या डेहराडून आणि ऋषिकेशमध्येही जोरदार पाऊस सुरु आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

हिमाचल प्रदेशात ढगफुटी

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे स्थानिकांसह पर्यटकांनाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिमल्याच्या रामपूर तालुक्यातील सरपारा गावात ढगफुटीमुळे मोठं नुकसान झालं आहे. तर कुल्लूमध्ये मुसळधार पावसामुळे मोहल खड्‍यात अचानक पूर आल्याने अनेक वाहनांचं नुकसान झालं आहे. माहितीनुसार, जेसीबीच्या साहाय्याने नुकसान झालेली वाहने बाहेर काढण्यात येत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.