विद्याविहार इमारत दुर्घटना : २० तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, पहिल्याच पावसात विद्याविहार येथील एक इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे.

202
विद्याविहार इमारत दुर्घटना : २० तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू

बिपरजॉय चक्रीवादळामुळे यावर्षी मान्सून लांबला होता. अखेर आता देशात सर्वत्र मान्सूनला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील पावसाने जोर धरला आहे. मात्र पहिल्याच पावसात मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचले असून काही ठिकाणी दुर्घटना घडली आहे. अशातच पहिल्याच मुसळधार पावसामुळे मुंबईत इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. विद्याविहारमधील इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. २० तासानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, पहिल्याच पावसात विद्याविहार येथील एक इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे. याठिकाणी तब्बल २० तास NDRF रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. २० तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात यश आले. या दोघांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अलका पालांडे आणि नरेश पालांडे अशी मृतांची नावे आहेत.

(हेही वाचा – Vaishvik Hindu Rashtra Mahotsav : २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी हिंदूंचे घोषणापत्र जाहीर; काय आहेत मुद्दे?)

विद्याविहार येथील तीन मजली प्रशांत निवास इमारत कोसळली

विद्याविहार येथील तीन मजली प्रशांत निवास इमारत रविवारी (२५ जून) सकाळी खचली. अशातच सततच्या पावसामुळे तेथील बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. दरम्यान तीन जणांना वाचवण्यात एनडीआरएफला यश आले. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या कुटुंबापैकी अलका आणि नरेश पालंडे यांना २० तासानंतर ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले . एनडीएआरएफ ने शर्तीचे प्रयत्न करुन या दोघांना बाहेर काढले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विद्याविहार येथील ही इमारत ४० वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईतील पहिल्याच पावसात या दुर्घटनेमुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.