Mohamed Muizzu : भारतीय सैनिकांच्या नावाखाली मालदीवचे राष्ट्रपती मागतात बहुमत; वस्तुस्थिती काय ?

Mohamed Muizzu : मोईज्जू यांनी सत्तेवर आल्या आल्याच भारतीय सैन्याला परत पाठवण्याविषयी विधान केले होते. आता त्यांना या मुद्द्याचे निमित्त करून त्यांना तेथील लोकसभा निवडणूक जिंकायची आहे.

201
Mohamed Muizzu : भारतीय सैनिकांच्या नावाखाली मालदीवचे राष्ट्रपती मागतात बहुमत; वस्तुस्थिती काय ?
Mohamed Muizzu : भारतीय सैनिकांच्या नावाखाली मालदीवचे राष्ट्रपती मागतात बहुमत; वस्तुस्थिती काय ?

देशातून 80 भारतीय सैनिकांना माघार घेणे संसदेतील बहुमतावर अवलंबून आहे. पुढील महिन्यात संसदेच्या निवडणुका होणार आहेत. भारतीय सैनिकांना परत पाठवायचे असेल, तर लोकांना विचारपूर्वक मतदान करावे लागेल, असे उद्गार मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू (Mohamed Muizzu) यांनी काढले आहेत. ते सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत मुइज्जू यांनी हे विधान केले आहे.

(हेही वाचा – Sunil Tatkare : शिवरायांची स्वराज्य प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीची वाटचाल – तटकरे)

चीन (China) समर्थक मुइज्जू यांनी गेल्या वर्षीच्या निवडणूक प्रचारात मालदीवमधील (Maldives) भारतीय सैन्य मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या पक्षाला संसदेत बहुमत नाही आणि आता त्यांना या मुद्द्याचे निमित्त करून त्यांना तेथील लोकसभा निवडणूक जिंकायची आहे. मोईज्जू यांनी सत्तेवर आल्या आल्याच भारतीय सैन्याला परत पाठवण्याविषयी विधान केले होते.

भारतीय सैनिक 10 मेपर्यंत त्यांच्या देशात परत येतील आणि मालदीवचे रेस्क्यू युनिट भारतीय तांत्रिक कर्मचारी चालवतील, असा करार भारत आणि मालदिवमध्ये झाला आहे.

मुइज्जू यांना हवे बहुमत

मुइज्जू भारतीय सैन्याविषयी पुढे म्हणाले की, मालदीव सरकार संसदेत बहुमत मिळाल्याशिवाय भारतीय सैनिकांना परत पाठवू शकत नाही. त्यासाठी पुढील निवडणुकीत बहुमत मिळवावे लागेल. हे सैनिक तपास आणि बचाव कार्यात आपल्या सैनिकांना मदत करतात. दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याबाबत करार केला आहे. परंतु, मजलिसमध्ये (संसदेत) बहुमत मिळाल्यावरच आम्ही अंतिम निर्णय घेऊ शकू.

मालदीवचे वृत्तपत्र म्हणते राष्ट्रपतींचे विधान खोटे

दरम्यान जेव्हा भारतीय सैनिक मालदीवमध्ये आले होते, तेव्हाही त्यात संसदेची भूमिका नव्हती आणि हा निर्णय त्या वेळच्या सरकारने घेतला होता. आता भारतीय सैनिकांच्या माघारीचीही तीच स्थिती आहे. मुइज्जू यांनी भारतीय सैनिकांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यात संसदेची भूमिका नाही. याबाबत अध्यक्ष चुकीची माहिती देत ​​आहेत, असे मालदीवमधीलच एका प्रसिद्ध वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. (Mohamed Muizzu)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.