Narayan Rane: अशोक चव्हाणांमुळे राज्यसभेचा पत्ता कट, आता राणेंच्या मनात काय चाललंय? राजकीय वर्तुळात चर्चा

223
Narayan Rane: अशोक चव्हाणांमुळे राज्यसभेचा पत्ता कट, आता राणेंच्या मनात काय चाललंय? राजकीय वर्तुळात चर्चा
Narayan Rane: अशोक चव्हाणांमुळे राज्यसभेचा पत्ता कट, आता राणेंच्या मनात काय चाललंय? राजकीय वर्तुळात चर्चा

अशोक चव्हाण यांनी ऐनवेळी भाजपमध्ये एंट्री करून थेट राज्यसभेची उमेदवारी मिळवली. त्यामुळे काही दिवसांतच राज्यसभेतून निवृत्त होणारे नारायण राणे यांचा पुन्हा उमेदवारीतून पत्ता कट झाला. आता तर राणे यांनी थेट रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले, पण पक्षाचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे राणेंच्या (Narayan Rane) मनात नेमकं काय सुरू आहे, अशी राजकीय वर्तुळात सुरू असून आगामी लोकसभा निवडणुकीबाबत त्यांनी सोमवारी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक नसून उमेदवारीसंदर्भातील सर्व निर्णय हे पक्षाचे वरिष्ठ नेते वरिष्ठ पातळीवर घेतील, अशी प्रतिक्रिया राणे यांनी रत्नागिरीत बोलताना दिली.

(हेही वाचा – Mohamed Muizzu : भारतीय सैनिकांच्या नावाखाली मालदीवचे राष्ट्रपती मागतात बहुमत; वस्तुस्थिती काय ? )

यावेळी  राज्यसभेतून उमेदवारी नाही?  लोकसभेच्या रिंगणात राणे असतील की नाही? यावर चर्चा सुरू झाली आहे. यावर रत्नागिरीच्या जागेवर भाजपचाच दावा असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात अधिक बोलताना नारायण राणे म्हणाले की, कोकणामध्ये रिफायनरी कोणत्याही परिस्थितीत आणणार आहोत. रिफायनरी रत्नागिरीत यावी यासाठी मी प्रयत्नशील असून संबंधितांशी बोलणी सुरू आहेत. राज्यामध्ये आम्ही सर्व जागा जिंकण्याचा प्रयत्न करू, पण ४८ पैकी किती जागा जिंकू, असे सांगण्यासाठी मी काही ज्योतिषी नाही, असे म्हणत त्यांना पत्रकारांचे प्रश्न टाळले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.