Sunil Tatkare : शिवरायांची स्वराज्य प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीची वाटचाल – तटकरे

128
Sunil Tatkare : शिवरायांची स्वराज्य प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीची वाटचाल - तटकरे
Sunil Tatkare : शिवरायांची स्वराज्य प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीची वाटचाल - तटकरे
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व अठरा पगड जाती- (Sunil Tatkare)धर्माच्या लोकांना एकत्र आणत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महिलांच्या, शेतकऱ्यांच्या, गोरगरीब रयतेच्या रक्षणार्थ महाराजांनी अनेक योजना त्या काळात राबवल्या. शिवरायांची तीच स्वराज्य संकल्पना आणि प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून येत्या काळात (Sunil Tatkare)राज्य गतिमान करण्यासाठी राष्ट्रवादी(rashtrawadi congress) वाटचाल करेल असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे(Sunil Tatkare) यांनी केले.
शिवजयंती निम्मित राष्ट्रवादीच्या(rashtrawadi congress) वतीने आयोजित केलेल्या शिवस्वराज्य सप्ताहाची सांगता सोमवारी तटकरे यांच्या उपस्थितीत रायगड किल्ल्यावर करण्यात आली. (Sunil Tatkare)त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आमदार अनिकेत तटकरे, प्रवक्ते संजय तटकरे, नरेंद्र राणे, बाप्पा सावंत, संजय पानसरे, दीपक परडीवाला आदीसह पक्षाचे पदाधिकारी तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तटकरे(Sunil Tatkare) म्हणाले, शिवरायांची प्रेरणा मनात ठेवत रयतेचे राज्य कसे असावे हे पुन्हा एकदा अधिक प्रभावित करण्यासाठी १२ फेब्रुवारी पासून मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया(Gateway of India) येथून स्वराज्य सप्ताहाची सुरुवात करण्यात आली होती. या सप्ताहानिमित्त निघालेली शिवज्योत वाशी, ठाणे, मलंगगड, शिवनेरी, वडूबुद्रुक, देहू- आळंदी, लालमहाल, सिंहगड, पुरंदर, प्रतापगड, पोलादपूर, महाड, पाचाड येथील ऐतिहासिक स्थळांना वंदन करून आज रायगड किल्ल्यावर दाखल झाली. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीत या स्वराज्य सप्ताहाचा समारोप झाला.(Sunil Tatkare)
पुढे तटकरे म्हणाले, शिवरायांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचे रक्षण करून तिला मातेची उपमा देऊन शिवरायांनी तिचा सन्मान केला होता. शिवरायांचे (Sunil Tatkare)हेच महिला विषयक धोरण डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकार महिलांसाठी काम करत आहे. चौथे महिला धोरण, लेक लाडकी अभियान, नमो नारी शक्ती या सारखी अभियाने आणि उपक्रम राबवून महिलांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच रयतेचे कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबविण्याची शपथ या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आम्ही घेत असल्याचे यावेळी तटकरे म्हणाले.(Sunil Tatkare)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.