वन अविघ्न पार्क अग्नितांडवः मॉक ड्रील होऊनही उडाला गोंधळ! चूक कोणाची?

118

लालबाग परिसरातील वन अविघ्न पार्क इमारतीला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग लागल्यानंतर एका तरुणाने जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या 30व्या मजल्यावरुन उडी मारली. यात त्याला आपले प्राण गमवावे लागले.

पण आगीसारख्या दुर्घटना घडल्यास त्यातून योग्य बचाव करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच या इमारतीत मॉक ड्रील करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. असे असताना सुद्धा प्रत्यक्षात आग लागल्यानंतर मात्र उपाययोजना अंमलात आणल्या गेल्या नाहीत. यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

झाले होते यशस्वी मॉक ड्रील

60 मजली वन अविघ्न पार्क इमारतीच्या 19व्या मजल्यावर शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास अचानक आग लागली. यामुळे मोठा गोंधळ उडाला. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व बचावकार्याला सुरुवात झाली. दरम्यान आगीतून वाचण्यासाठी एका 30 वर्षीय तरुणाने इमारतीच्या 19व्या मजल्यावरुन उडी मारत आपले प्राण गमावले. पण अशी परिस्थिती उद्भवल्यास प्राथमिक उपाययोजना म्हणून या इमारतीत 1 ऑक्टोबर रोजी मॉक ड्रील घेण्यात आले होते. यामध्ये अचानक आग लागल्यास इमारतीत असलेल्या रेफ्यूजी एरियामध्ये रहिवाशांना एकत्र येण्यास सांगण्यात आले होते. पण तरीही शुक्रवारी आग लागल्यानंतर रहिवाशांची तारांबळ उडाली.

असे झाले होते मॉक ड्रील

  • 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता इमारतीतील फायर अलार्म वाजवण्यात आला.
  • हा अलार्म वाजल्यानंतर रहिवाशांना तातडीने इमारतीतील रेफ्यूजी एरियामध्ये जमण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.
  • इमारतीच्या 14, 20, 25, 30, 42 आणि 48व्या मजल्यांवर रेफ्यूजी एरिया तयार करण्यात आले आहेत.
  • या एरियात आल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी रहिवाशांना तळ मजल्यावर घेऊ जाण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले होते.

परंतु अशा पद्धतीने यशस्वी मॉक ड्रील करण्यात येऊन सुद्धा आग लागल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे यात इमारतीच्या सुरक्षा रक्षकांची हलगर्जी आहे का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.