Ministry of External Affairs : कतारमधील आठ माजी नौसैनिकांच्या शिक्षेविरोधात भारत करणार याचिका

कतार येथील अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीमध्ये काम करणाऱ्या आठ भारतीयांना ऑगस्टमध्ये कथित हेरगिरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर २६ ऑक्टोबरला या सर्वांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

137
Ministry of External Affairs : कतारमधील आठ माजी नौसैनिकांच्या शिक्षेविरोधात भारत करणार याचिका

कतारच्या तुरुंगात बंद असलेल्या आठ माजी भारतीय खलाशांच्या फाशीच्या शिक्षेला स्थानिक न्यायालयाने स्थगिती दिली होती. दरम्यान, गुरुवारी आठ जणांना सुनावलेल्या तुरुंगवासाच्या शिक्षेविरुद्ध ६० दिवसांच्या आत याचिका करता येणार आहे, अशी माहिती (Ministry of External Affairs) भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे नवे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली.

(हेही वाचा – ED Raids : काँग्रेस आमदार सुरेंद्र पवार आणि दिलबाग सिंग यांच्या घरावर ईडीचे छापे)

काय म्हणाले रणधीर जयस्वाल ?

याबाबत अधिक माहिती देताना रणधीर जयस्वाल (Ministry of External Affairs) म्हणाले, कतारच्या न्यायालयाने २८ डिसेंबर रोजी या आठ जणांच्या फाशीला स्थगिती दिली होती. सदर आदेश गोपनीय असला तरी आमच्या कायदेशीर टीमकडे तो आहे. आठही जणांना वेगवेगळ्या कालावधीसाठी शिक्षा सुनावण्यात आली आहे. फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. आमच्याकडे ६० दिवसांचा वेळ आहे आणि आम्ही कतारच्या सर्वोच्च न्यायालय, द कोर्ट ऑफ कॅसेशनकडे जाऊ शकतो. कायदेशीर पथक या प्रकरणावर काम करत असून आम्ही कायदेशीर टीम आणि पीडित कुटुंबाच्या संपर्कात आहोत.

आम्ही त्यांच्या पाठीशी –

परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) सांगितले होते की, आमचे राजदूत आणि इतर अधिकारी कुटुंबीयांसह न्यायालयात उपस्थित होते. या खटल्याच्या सुरुवातीपासून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करत राहू. आम्ही हे प्रकरण कतारी अधिकाऱ्यांकडेही मांडत राहू.

(हेही वाचा – Uttar Korea Vs South Korea : उत्तर कोरियाचा दक्षिण कोरिया वर हल्ला; २०० तोफगोळ्यांचा मारा)

कतार येथील अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीमध्ये काम करणाऱ्या आठ भारतीयांना ऑगस्टमध्ये कथित हेरगिरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर २६ ऑक्टोबरला या सर्वांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. (Ministry of External Affairs)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.