Mill Workers Mhada Lottery : आतापर्यंत ७२,०४१ अर्जदार पात्र, मुदतवाढ १४ जानेवारीपर्यंत

गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या विशेष अभियानात ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने एकूण ९५,८१२ अर्ज प्राप्त झाले आहेत.

5077
Mill Workers Mhada Lottery : आतापर्यंत ७२,०४१ अर्जदार पात्र, मुदतवाढ १४ जानेवारीपर्यंत
Mill Workers Mhada Lottery : आतापर्यंत ७२,०४१ अर्जदार पात्र, मुदतवाढ १४ जानेवारीपर्यंत

मुंबईतील ५८ बंद/डबघाईला आलेल्या गिरण्यांमधील म्हाडाकडे नोंदणीकृत व यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ‘म्हाडा’तर्फे स्वीकारण्यात येत आहेत. मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या विशेष अभियानात ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने एकूण ९५,८१२ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ७२,०४१ अर्जदार पात्र ठरले असून उर्वरित अर्जांची छाननी करून पात्र/अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे अर्ज सादर करण्याच्या या कालबद्ध विशेष अभियानाला १४ जानेवारी, २०२४ पर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. (Mill Workers Mhada Lottery)

गिरणी कामगारांचा कागदपत्रे सादर करण्यासाठी प्रतिसाद

गिरणी कामगार व त्यांच्या वारसांसाठी १४ सप्टेंबर, २०२३ पासून राबविण्यात येणार्‍या या विशेष अभियानामध्ये गिरणी कामगारांचा कागदपत्रे सादर करण्यासाठी प्रतिसाद बघता ‘म्हाडा’तर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. यापूर्वी ऑफलाइन अथवा ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे सादर केलेल्या गिरणी कामगार वारसांना नव्याने कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नसल्याचे मंडळातर्फे कळविण्यात आले आहे. (Mill Workers Mhada Lottery)

(हेही वाचा – Beach Mobile Toilets : पावणे दोन वर्षांनंतर समुद्र किनाऱ्यावरील फिरती स्वच्छतागृहे कागदावरच)

या मोबाईल ॲपवर भेट देऊ शकता 

गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी गिरणीमध्ये काम केल्याबाबतची कागदपत्रे ऑफलाइन पद्धतीने मुंबईतील वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्रिकेट क्लब जवळ असणाऱ्या समाज मंदिर हॉल येथे सादर करावीत. ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर करण्यासाठी Mill workers eligibility हे मोबाइल ॲप तयार करण्यात आले असून हे ॲप Google Play Store वर उपलब्ध आहे. तसेच https://millworkereligibility.mhada.gov.in या संकेतस्थळावरही ऑनलाइन कागदपत्रे सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. (Mill Workers Mhada Lottery)

काही अडचण उद्भवल्यास या क्रमांकावर संपर्क साधा

गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या विशेष अभियानात ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने एकूण ९५,८१२ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ७२,०४१ अर्जदार पात्र ठरले असून उर्वरित अर्जांची छाननी करून पात्र/अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे. यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या ०१,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांपैकी ज्या गिरणी कामगार वारसांनी पात्रतेसंबंधीची कागदपत्रे सादर केलेली नाहीत, अशा गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अथवा ऑफलाइन पद्धतीने सादर करावी. या प्रक्रियेदरम्यान काही अडचण उद्भवल्यास मार्गदर्शनाकरिता ९७१११९४१९१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे. (Mill Workers Mhada Lottery)

(हेही वाचा – Malabar Hill Reservoir Reconstruction : सोमवारी शहर भागात दहा टक्के पाणीकपात)

या कागदपत्रांची आहे आवश्यकता

मंडळातर्फे सर्व संबंधित गिरणी कामगार व वारसांना आवाहन करण्यात येत आहे की, पात्रता निश्चितीकरिता मंडळाने विहित केलेल्या १३ पैकी कोणत्याही कागदपत्रांची स्वसाक्षांकीत छायांकित प्रत सादर करावी. यामध्ये गिरणी कामगारांचे ओळख पत्र , तिकीट नंबरची प्रत, सर्व्हिस प्रमाणपत्र, लाल पास, प्रॉव्हिडंट फंड क्रमांक, इ एस आय सी क्रमांक, मिल प्रमाणपत्र प्रत, हजेरी पत्र , लीव्ह रजिस्टर प्रत, उपदान प्रदान आदेश, भविष्य निर्वाह निधी सेटलमेंट आदेशाची प्रत, पगार पावती यापैकी उपलब्ध कागदपत्र सादर करावीत. तसेच आधार कार्ड सादर करणे बंधनकारक आहे. हे अभियान कालबद्ध असल्याने अधिकाधिक गिरणी कामगार व वारसांनी या विशेष अभियानात सहभागी होऊन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. (Mill Workers Mhada Lottery)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.