Bangladeshi Infiltrators : बांगलादेशी घुसखोरांमुळे राज्यासह संपूर्ण देशाला धोका

151

मुंबईसह राज्यात बांगलादेशी घुसखोरांची (Bangladeshi Infiltrators) संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात बांगलादेशी घुसखोर वर पोलीस यंत्रणांकडून वारंवार कारवाई करून देखील त्यांची संख्या कमी न होता वाढतच चालली आहे. पोलीस यंत्रणांकडून जेवढ्या संख्येने बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करून त्यांची रवानगी बांगलादेशात केली जाते, त्याच्या दुपटीने पुन्हा बांगलादेशी हे एजंट मार्फत भारतात घुसखोरी करीत आहेत. बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशीची वाढती संख्या ही चिंतेची बाब असून देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबईसह नवी मुंबई, ठाणे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर (Bangladeshi Infiltrators) नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. पोलिस यंत्रणेच्या या कारवाईत मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिकांवर सुरू असलेल्या कारवाईमुळे भयानक वास्तव समोर येत आहे. मुंबई गुन्हे शाखेने नुकत्याच केलेल्या कारवाईत बांगलादेशीयांना भारतात बेकायदेशीररित्या आणणाऱ्या टोळ्या आणि त्यांचे एजंट मोठ्या संख्येने कार्यरत असल्याचे समोर आले आहे.

मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे, कोंकण, नाशिक, संभाजीनगर या महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी लागणारे मजूर हे मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक असून स्वस्त मजुरीमध्ये बांगलादेशी काम करीत असल्यामुळे त्यांची मागणी देखील मोठी असल्याचे मुंबई गुन्हे शाखेने अटक केलेल्या एजंटच्या चौकशीत समोर आले आहे.

बांधकाम क्षेत्रात बांगलादेशी नागरिकांची मोठी मागणी

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पुणे नाशिक इत्यादी शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम विकासकांकडून बांधकामे सुरू आहेत. या बांधकामाच्या ठिकाणी स्वस्त दरात मजुरी करण्यासाठी बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिकांना घुसखोरी (Bangladeshi Infiltrators) करून भारतात आणले जाते. त्यानंतर त्यांना बांधकामाच्या साईटवर आणून काम दिले जाते, तसेच त्यांची राहण्याची सोय देखील बांधकामाच्या ठिकाणीच केली जाते.

बांगलादेशी मजुरांची सोय करण्याची जबाबदारी सर्वस्वी ‘लेबर कॉन्ट्रॅक्टर’वर सोपवली जाते. बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना पकडण्याच्या भीतीने बांधकामाचे ठिकाण सोडण्याची परवानगी नसते, त्यांना हवं नको ते सर्व लेबर कॉन्ट्रॅक्टरची माणसे पुरवतात अशी माहिती समोर आली.

(हेही वाचा Parliament Attack : संसदेतील घुसखोरी शहरी नक्षलवाद्यांचा कट?)

बांगलादेशींना भारतात आणणारी टोळी कार्यरत

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने नुकतीच दोन एजंटला शिवडीतील बरकतअली नगर झोपडपट्टी येथून अटक केली आहे. हे एजंट बांगलादेशी नागरिक असून त्यांनी स्वतःची ओळख लपवून स्वतःचे आधारकार्ड व भारतीय असल्याचे इतर बनावट पुरावे तयार करून घेतले आहे. या दोघांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. हे दोघे बांगलादेश येथून २० ते ३० हजार रुपये घेऊन बांगलादेशीयांना बेकायदेशीररित्या भारतात आणण्याचे काम करतात. मुंबई, तसेच देशात मोठ्या प्रमाणात यासारखे अनेक एजंटच्या टोळ्या कार्यरत आहे.

या टोळीचे एजंट सर्वत्र पसरले आहे, या टोळीचे एजंट हे बांगलादेशी घुसखोरच (Bangladeshi Infiltrators) असतात. भारतात आल्यानंतर स्वतःची ओळख लपवून भारतीय असल्याचे बनावट पुरावे तयार करतात. त्यानंतर हेच घुसखोर एजंट २० ते ४० हजार रुपये घेऊन बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे भारतात आणतात. एवढ्यावर न थांबता हे एजंट या बांगलादेशी नागरिकांचे बनावट आधारकार्ड बनवून त्यांना मुस्लिम बहुल झोपडपट्ट्यांमध्ये त्यांची राहण्याची सोय करतात.

बांगलादेशात हवाला मार्फत पैशांची देवाणघेवाण 

गुन्हे शाखेने अटक केलेल्या एजंटच्या चौकशीत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हे एजंट बेकायदेशीर भारतात राहणाऱ्या बांगलादेशीयांचे आर्थिक व्यवहार सांभाळतात, भारतातून बांगलादेशात पैसे पाठविण्यासाठी एजंट मार्फत हवालाचा वापर केला जातो. मुंबई किंवा भारतातील एजंट आणि बांगलादेशात असणारे एजंट एकमेकांच्या संपर्कात राहून हवाला मार्फत पैशांची देवाणघेवाण करीत असतात, अशी माहिती समोर आली आहे.

(हेही वाचा Conversion of Tribals : आदिवासींच्या धर्मांतरणाला चाप लागणार; मंत्री मंगलप्रभात लोढांची ग्वाही)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.