MIDC कडून दर बुधवार रात्रीपासून पाणीकपात सुरू

अल निनो-आयओडीच्या परिणामामुळे पावसाळा लांबल्याने पाण्याची टंचाई टाळण्यासाठी निर्णय.

194
MIDC कडून दर बुधवार रात्रीपासून पाणीकपात सुरू
MIDC कडून दर बुधवार रात्रीपासून पाणीकपात सुरू
  • कल्याण : प्रतिनिधी

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अल निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता लक्षात घेऊन दर बुधवारी पाणी कपातीचा (Water Cut) निर्णय घेतला आहे. जलसंपदा विभागासोबत १९ जून रोजी झालेल्या आढावा बैठकीच्या निर्णयानुसार आगामी काळात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

एमआयडीसीच्या (MIDC) कार्यकारी अभियंत्यांनी या संदर्भात रविवारी तातडीने काढलेल्या पत्रानुसार, बारवी जलशुद्धीकरण केंद्र आणि जांभूळ-शहाड जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा (Water supply) दर बुधवारी रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील काही काळ कमी दाबाने पाणी येईल, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Kieron Pollard टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू)

कुणावर परिणाम होणार ?

ही कपात एमआयडीसीच्या (MIDC) अंबरनाथ, डोंबिवली आणि ठाणे विभाग क्र. २ महापे परिसरातील सर्व औद्योगिक आणि घरगुती ग्राहकांना लागू राहणार आहे. एमआयडीसीने संबंधित सर्व ग्राहकांना विभागीय स्तरावर याबत कळवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मान्सून लांबण्याच्या शक्यतेमुळे निर्णय

यंदा अल निनो आणि इंडियन ओशन डायपोलच्या परिणामामुळे मान्सून (Monsoon) लांबण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे जलसाठा जपून वापरण्यासाठी जलसंपदा विभागाने पाणी कपातीचा सल्ला दिला होता. त्यानुसारच एमआयडीसीने हा निर्णय घेतला आहे.

ग्राहकांना आवाहन

एमआयडीसी प्रशासनाने औद्योगिक आणि घरगुती वापरकर्त्यांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. बुधवार रात्री १२ वाजण्याआधी पाण्याचा साठा करून ठेवावा, जेणेकरून शुक्रवार रात्रीपर्यंत अडचण होणार नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.