MHADA Layout : म्हाडा वसाहतीमधील मलवाहिन्यांची क्षमता वाढवणार

म्हाडाच्या विविध वसाहतींमध्ये यापूर्वी टाकण्यात आलेल्या मलवाहिन्यांच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यात येणार असून यासाठी आता म्हाडाच्या सर्व वसाहतीतील मलनि:सारण वाहिन्यांच्या सेवांबाबत विस्तृत आराखडा तयार केला जाणार आहे.

1052
MHADA : गिरणी कामगार तथा त्यांच्या वारसांची पात्रता: विशेष अभियानाला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
MHADA : गिरणी कामगार तथा त्यांच्या वारसांची पात्रता: विशेष अभियानाला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

म्हाडाच्या (MHADA) विविध वसाहतींमध्ये यापूर्वी टाकण्यात आलेल्या मलवाहिन्यांच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यात येणार असून यासाठी आता म्हाडाच्या सर्व वसाहतीतील मलनि:सारण वाहिन्यांच्या (Sewage channels) सेवांबाबत विस्तृत आराखडा तयार केला जाणार आहे. महापालिकेच्यावतीने पश्चिम उपनगरातील म्हाडा वसाहतीमधील (MHADA colony) मलनि:सारण वाहिन्यांच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने सल्लागार नेमण्यात आले आहेत. (MHADA Layout)

वाहिनी तुंबून मलजल रस्त्यावर

“पश्चिम उपनगरातील म्हाडा वसाहतीतील (MHADA colony) लेआऊट मधील विद्यमान रस्त्यांवर मलनिःसारण वाहिनीची क्षमता अपूरी पडत आहे. त्यामुळे या वसाहतीतील मलनिःसारण वाहिनी (Sewage channels) तुंबून मलजल रस्त्यावर वाहते. परिणामी यातून दुर्गंधी पसरुन नागरिकांना याचा प्रचंड त्रास होतो. (MHADA Layout)

मलनिःसारण वाहिनींचा अभ्यास

त्यामुळे पश्चिम उपनगरातील विद्यमान म्हाडा वसाहतीतील मलनिःसारण वाहिन्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या मलनिःसारण वाहिनींचा (Sewage channels) अभ्यास, विश्लेषण, योजना, आराखडा, व त्याचा तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. (MHADA Layout)

(हेही वाचा – घरात बसणाऱ्यांना ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे महत्त्व काय कळणार?; CM Eknath Shinde यांचा हल्लाबोल)

मलनि:सारण समस्येचे निराकारण

या म्हाडा वसाहतीचा (MHADA colony) विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तसेच यासाठीची निविदा मागवण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात येत असल्याची मलनि:सारण प्रकल्प विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे म्हाडा वसाहतींमध्ये प्रत्यक्षात मलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या सभोवतालच्या भागातील मलनि:सारण समस्येचे निराकारण होऊन या व्यवस्थेचा लाभ मिळेल तसेच नागरिकांचे दैनंदिन जनजीवन आरोग्यदायी होण्यास मदत होईल,असे प्रकल्प विभागाने स्पष्ट केले आहे. (MHADA Layout)

वाहिन्यांची क्षमता कमी

म्हाडाच्या अनेक वसाहतींमधील इमारती जुन्या झाल्या असून त्याठिकाणी पुनर्विकास प्रकल्प (Redevelopment Project) राबवल्याने सध्याची मलनि:सारण वाहिन्यांची (Sewage channels) क्षमता कमी पडत असल्याने त्याची क्षमता वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील म्हाडा वसाहतीची निवड करण्यात आली आहे. तसेच पूर्व उपनगरातील म्हाडा वसाहतीतील मलवाहिन्यांच्या सेवांचा विस्तृत आराखडा तयार केला जाणार असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया राबवली जाईल, असेही या विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (MHADA Layout)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.