Megablock : रविवारी तिन्हीही मार्गावर मेगाब्लॉक

विविध अभियांत्रिकी तसेच देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे उपनगरीय वाहतूक सेवेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर रविवारी, २८ जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

202
Megablock : रविवारी तिन्हीही मार्गावर मेगाब्लॉक

दर रविवारी रेल्वेचा देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येतो त्यानुसार विविध अभियांत्रिकी तसेच देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे उपनगरीय वाहतूक सेवेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर रविवारी, २८ जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.त्यामुळे तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. (Megablock)

पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंक आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी १५.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर पाच तासांचा  ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व धिम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर चालवल्या जातील. (Megablock)

हार्बर मार्ग

कुठे? : पनवेल ते सीएसएमटी अप आणि सीएसएमटी ते पनवेल बेलापूर डाऊन मार्गावर
किती वाजता? : सकाळी १०:३३ ते दुपारी ३:४९
परिणाम : पनवेल येथून सकाळी ११:०२ ते दुपारी ३:५३ वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याच्या दिशेने जाणारी अप ट्रान्सहार्बर सेवा आणि पनवेल येथून सकाळी १०:०१ ते दुपारी ३:२० वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९:३० वाजता सुटेल आणि १०:५० वाजता पनवेल येथे पोहोचेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३:१६ वाजता सुटेल. सायंकाळी ४:३६ वाजता पनवेल येथे पोहोचेल.

(हेही वाचा : Pune Crime : पुणे विमानतळावर २ सोने तस्करांना अटक)

मध्य रेल्वे

कुठे? : माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर
किती वाजता? : सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५
परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०:२५ ते दुपारी ३:३५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान नियोजित थांब्यांनुसार डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सकाळी १०:५० ते दुपारी ३:४६ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर नियोजित थांब्यांनुसार वळवण्यात येतील. माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.