• होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Search
Hindhusthanpost.com
हिंदी
27.7 C
Mumbai
Hindhusthanpost.com
Thursday, June 19, 2025
Facebook
Instagram
Twitter
Youtube
हिंदी
  • होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Home समाजकारण बंधपत्रित डॉक्टर पदे समाविष्ट करण्यास अखेर वैद्यकीय शिक्षण खाते तयार!
  • समाजकारण

बंधपत्रित डॉक्टर पदे समाविष्ट करण्यास अखेर वैद्यकीय शिक्षण खाते तयार!

एमडी, एमएस डॉक्टरांच्या डोक्यावर होती टांगती तलवार

August 12, 2023
196
Facebook
Twitter
WhatsApp
Email
    बंधपत्रित डॉक्टर पदे समाविष्ट करण्यास अखेर वैद्यकीय शिक्षण खाते तयार!
    बंधपत्रित डॉक्टर पदे समाविष्ट करण्यास अखेर वैद्यकीय शिक्षण खाते तयार!

    राज्यातील रुग्णालयांमध्ये बंधपत्रित सेवा डॉक्टरांची संख्या वाढवण्याच्या सरकारी अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्याने एमडी, एमएस डॉक्टरांच्या डोक्यावर टांगलेली तीन महिन्यांची बेरोजगारीची कुऱ्हाड अखेरीस वैद्यकीय शिक्षण खात्याने बाजूला सारली. बंधपत्रित डॉक्टरांची पदे कमी आणि जास्त उमेदवार असल्याच्या मुद्द्यावर वैद्यकीय शिक्षण विभाग सरकारी अध्यादेशाचे पालन करत नसल्याने मार्ड या डॉक्टरांच्या संघटनेकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. अखेरीस शुक्रवारी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी ही पदे भरण्याची प्रक्रिया शनिवार, १२ ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

    (हेही वाचा – Independence Day : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांची कारागृहातून सुटका)

    मार्ड संघटनेची मागणी – 

    राज्यातील रुग्णालयांमध्ये बंधपत्रित सेवा डॉक्टरांची संख्या १ हजार ६०० होती. ही कमी पडत असल्याने डॉक्टरांकडून पदसंख्या वाढविण्याच्या मागणीचा विचार करुन सरकारने ती पदे अतिरिक्त १ हजार ४३२ एवढी करुन घेतली. अतिरिक्त जागा १ हजार ४३२ तसेच पूर्वीच्या १ हजार ६०० जागा अशा मिळून ३ हजार ३२ जागांवर उमेदवार त्वरीत काम करु शकतील अन्यथा एमडी, एमएस सारख्या डॉक्टरांना तीन महिने बेरोजगारी सहन करावी लागणार होती.

    सरकारने जानेवारी महिन्यात काढलेल्या सरकारी अध्यादेशाची अंबलबजावणी करावी, १ हजार ४३२ पदांची त्वरीत भरती करावी अशी मागणी मार्ड डॉक्टरांनी केली आहे. यामुळे अतिरिक्त जागा १४३२ तसेच पूर्वीच्या १६०० जागा अशा मिळून ३०३२ जागांवर उमेदवार त्वरीत काम करु शकतील असा मुद्दा मार्डच्यावतीने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत मांडला गेला.

    नवीन १ हजार ४३२ पदे शुक्रवारी रात्रीपर्यंत जोडण्यात येतील अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. आता जागा भरण्याची प्रक्रिया सुरु केली आहे असे आश्वासन मिळताच आक्रमक पवित्रा घेतलेल्या डॉक्टरांनी आंदोलनाचा निर्णय पाठी घेतला. अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासन दिले असते तर शुक्रवारी आम्ही आंदोलन जाहीर करण्याच्या तयारीत होतो, असे मार्डचे सदस्य म्हणाले.

    हेही पहा –

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

    Check your inbox or spam folder to confirm your subscription.

    • TAGS
    • account
    • bonded
    • bonded doctor posts
    • doctor
    • education
    • Government Ordinance
    • hospital
    • include
    • Mard member
    • Mard organization
    • MD
    • medical
    • Medical Education
    • MS Doctor
    • permission
    • Posts
    • prepared
    • एमएस डॉक्टर
    • एमडी
    • खाते
    • डॉक्टर
    • तयार
    • पदे
    • परवानगी
    • बंधपत्रित
    • बंधपत्रित डॉक्टर पदे
    • मार्ड सदस्य
    • मार्ड संस्था
    • रुग्णालय
    • वैद्यकीय
    • वैद्यकीय शिक्षण
    • शासकीय अध्यादेश
    • शिक्षण
    • समाविष्ट
    Facebook
    Twitter
    WhatsApp
    Email
      Previous articleInflation in India : देशाचा किरकोळ महागाई दर ६ टक्क्यांच्या वर जाण्याचा अंदाज
      Next articleTiger death :गोंदिया येथे कारच्या धडकेत वाघाचा मृत्यू
      HindusthanPost Bureau

      Latest News

      • चला चाकरमान्यांनो तयारीला लागा; Konkan Railway चे आरक्षण जूनच्या ‘या’ तारखेपासून सुरू होणार June 19, 2025
      • मुनीर यांना Donald Trump यांनी का बोलाविले जेवायला?; इराण-इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी अधिकाऱ्याचा दावा काय? June 19, 2025
      • मतदारांनी ठाकरे गटाला कधीच टाटा-बाय-बाय केलंय; Eknath Shinde यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं June 19, 2025
      • BRICS कडून डॉलरला पर्याय उभा करण्याचा प्रयत्न; अमेरिकेचा निर्वाणीचा इशारा June 19, 2025
      • देवनार आणि कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यात मापात पाप! आता BMC बसवणार वजनकाटा June 19, 2025
      Join Our WhatsApp Community

      Popular

      • चला चाकरमान्यांनो तयारीला लागा; Konkan Railway चे आरक्षण जूनच्या ‘या’ तारखेपासून सुरू होणार June 19, 2025
      • मुनीर यांना Donald Trump यांनी का बोलाविले जेवायला?; इराण-इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी अधिकाऱ्याचा दावा काय? June 19, 2025
      • मतदारांनी ठाकरे गटाला कधीच टाटा-बाय-बाय केलंय; Eknath Shinde यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं June 19, 2025
      • BRICS कडून डॉलरला पर्याय उभा करण्याचा प्रयत्न; अमेरिकेचा निर्वाणीचा इशारा June 19, 2025
      • देवनार आणि कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यात मापात पाप! आता BMC बसवणार वजनकाटा June 19, 2025
      Tweets by HindusthanPostM

      © Hindusthan Post All Rights Reserved

      • About Us
      • Contact Us
      • Disclaimer
      • Terms Of Service
      • Privacy Policy
      This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
      Accept
      Decline