Abhay Yojana : जास्तीत जास्त नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा; राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन

अभय योजनेच्या पहिल्या टप्प्यात जानेवारी अखेरपर्यंत ३४ हजार ४२७ नागरिकांनी योजनेचा फायदा घेतला. यात निष्पादित दस्तावरील १ लाखापर्यंत मुद्रांक शुल्क अथवा दंड असलेल्या १० हजार २५ प्रकरणांमध्ये शासनाने १०० टक्के शुल्क माफी दिली. त्यानुसार शासनाने १२ कोटी २७ लाख ५९ हजार ६८५ रुपयांचे शुल्क माफ करून नागरिकांना मोठा दिलासा दिला, तर शासनाला ८१ कोटी ७८ लाख ६३ हजार ६३९ रुपयांचा महसूल मिळाल्याचेही महसूलमंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

1443
Abhay Yojana : जास्तीत जास्त नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा; राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन
Abhay Yojana : जास्तीत जास्त नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा; राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन

नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून सुरू असलेल्या अभय योजनेच्या (Abhay Yojana) पहिल्या टप्प्यातील कालावधीला नागरिकांच्या मागणीनुसार मुदतवाढ दिली असून या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी गुरूवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना केले. अभय योजनेच्या (Abhay Yojana) पहिल्या टप्प्यात जानेवारी अखेरपर्यंत ३४ हजार ४२७ नागरिकांनी योजनेचा फायदा घेतला. यात निष्पादित दस्तावरील १ लाखापर्यंत मुद्रांक शुल्क अथवा दंड असलेल्या १० हजार २५ प्रकरणांमध्ये शासनाने १०० टक्के शुल्क माफी दिली. त्यानुसार शासनाने १२ कोटी २७ लाख ५९ हजार ६८५ रुपयांचे शुल्क माफ करून नागरिकांना मोठा दिलासा दिला, तर शासनाला ८१ कोटी ७८ लाख ६३ हजार ६३९ रुपयांचा महसूल मिळाल्याचेही महसूलमंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी स्पष्ट केले. (Abhay Yojana)

राज्यातील १९८० पासून २००० पर्यंत रखडलेल्या मुद्रांक शुल्काच्या वसूलीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून दोन टप्प्यात अभय योजना (Abhay Yojana) राबविण्यात येत आहे. या योजनेत २००० पुर्वीच्या प्रकरणात दंडात १०० टक्के सवलत आणि मुद्रांकात सवलत दिली जात आहे. एक लाखाच्या आतील मुद्रांक फरक असल्यास आणि ही प्रकरणे १९८० ते २००० या कालावधीतील असल्यास मुद्रांक शुल्कात ८० टक्के आणि त्यावरील दंडात १०० टक्के सवलत दिली आहे. एक लाखापेक्षा जास्त मुद्रांक असल्यास ५० टक्के रक्कम आणि दंड पूर्ण माफ करण्यास मुभा दिली आहे. तसेच २००० नंतरच्या प्रकरणांत २५ लाखांपेक्षा जास्त मुद्रांक असल्यास दंड ९० टक्के माफ होणार असून २५ लाखांपेक्षा जास्त मुद्रांक शुल्क असल्यास त्यामध्ये २५ टक्के माफी आणि दंड पूर्ण माफ केला जाणार आहे. जिल्हा मुद्रांक कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत ही योजना राबवली जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. (Abhay Yojana)

(हेही वाचा – Mumbai Deep Cleaning : मुख्यमंत्री स्वच्छतेबाबत नाराज, सहायक आयुक्तांना दिले कारवाईचे संकेत)

या योजनाचा (Abhay Yojana) पहिला टप्पा १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात आला होता. पण नागरिकांच्या मागणीमुळे महसूल मंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी या टप्प्यातील कालावधी वाढविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शासनाने पहिल्या टप्प्याचा कालावधी वाढवून २९ फेब्रुवारी पर्यंत केला आहे. या योजनेचा (Abhay Yojana) दुसरा टप्पा १ मार्च ते ३१ मार्च पर्यंत राबविला जाणार आहे. सदरची योजना ही ठराविक काळासाठी असल्याने अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा (Abhay Yojana) लाभ घेण्याचे आवाहनही विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले. (Abhay Yojana)

विभाग निहाय प्रकरणांची माहिती

मुंबई विभाग (१८,४८०), ठाणे विभाग (६,८१०), पुणे विभाग (४२७६), नाशिक विभाग (१५५३), नागपूर विभाग (१२०७), छ. संभाजी नगर (१०५२), अमरावती विभाग (५०१), तर लातूर विभाग (४६८) आदी प्रकरणांचा यात समावेश असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. (Abhay Yojana)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.