Haldawi Madarsa Demolition : उत्तराखंडमध्ये अवैध मदरसा जमीनदोस्त; मुसलमानांकडून पोलिसांवरच दगडफेक, जाळपोळ

Haldawi Madarsa Demolition : दंगलखोरांनी मदरसा पाडण्यासाठी वापरलेल्या बुलडोझरचीही तोडफोड केली. दगडफेकीत एसडीएम, पोलीस-महामंडळाचे कर्मचारी, पत्रकार जखमी झाले. या वेळी पोलिसांनी हवेत गोळीबार आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

240
Haldawi Madarsa Demolition : उत्तराखंडमध्ये अवैध मदरसा जमीनदोस्त; मुसलमानांकडून पोलिसांवरच दगडफेक, जाळपोळ
Haldawi Madarsa Demolition : उत्तराखंडमध्ये अवैध मदरसा जमीनदोस्त; मुसलमानांकडून पोलिसांवरच दगडफेक, जाळपोळ

उत्तराखंडमधील हल्दवानी (Haldwani) महापालिकेने गुरुवार, ८ फेब्रुवारी रोजी अवैध मदरसा बुलडोझरने जमीनदोस्त केला. याच ठिकाणी नमाज पठणासाठी इमारत बांधली जात होती, तीही या कारवाईत पाडण्यात आली. (Haldawi Madarsa Demolition)

या वेळी बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या पथकावर मुसलमानांनी दगडफेक केली. धर्मांधांनी बांभूळपुरा पोलीस ठाण्याला चारही बाजूंनी घेरले आणि दगडफेक केली. अनेक वाहने जाळली. या वेळी झालेल्या जाळपोळीमुळे ट्रान्सफॉर्मरलाही आग लागली.

(हेही वाचा – Abhishek Ghosalkar : ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर दहिसरमध्ये गोळीबार)

पोलीस-महामंडळाचे कर्मचारी जखमी

सध्या परिसरातील वीजपुरवठा ठप्प झाला आहे. येथील वनभुलपुरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दंगलखोरांनी मदरसा पाडण्यासाठी वापरलेल्या बुलडोझरचीही तोडफोड केली. दगडफेकीत एसडीएम, पोलीस-महामंडळाचे कर्मचारी, पत्रकार जखमी झाले. या वेळी पोलिसांनी हवेत गोळीबार आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

जागा पूर्णपणे बेकायदेशीर – महापालिका आयुक्त

‘मदरसा (Madrasa) आणि नमाजची जागा पूर्णपणे बेकायदेशीर आहे. महापालिकेने तीन एकर जागा अतिक्रमणमुक्त करून मदरसा व नमाजची जागा सील केली होती. गुरुवारी ते पाडण्यात आले’, अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त पंकज उपाध्याय यांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक आणि पोलिस आणि गुप्तचर विभागाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.