Abhishek Ghosalkar : FB Live नंतर गोळीबार; अभिषेक घोसाळकर यांची हत्या करून मॉरिसची आत्महत्या 

Abhishek Ghosalkar : फेसबुक लाईव्ह सुरू असतांनाच अभिषेक घोसाळकर यांच्यावर तीन गोळ्या झाडून अँटीचेंबर्समध्ये जाऊन मॉरिसने स्वतःवर चार गोळ्या झाडल्या.

886
Abhishek Ghosalkar : FB Live नंतर गोळीबार; अभिषेक घोसाळकर यांची हत्या करून मॉरिसची आत्महत्या 
Abhishek Ghosalkar : FB Live नंतर गोळीबार; अभिषेक घोसाळकर यांची हत्या करून मॉरिसची आत्महत्या 

शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस याने गोळीबार करून स्वतःवर चार गोळ्या झाडून घेतल्याची खळबळजनक घटना बोरिवली पश्चिम आयसी कॉलनी येथे गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या गोळीबारात मॉरिसचा जागीच मृत्यू झाला असून अभिषेक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतांना मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Abhishek Ghosalkar)

(हेही वाचा – Abhay Yojana : जास्तीत जास्त नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा; राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन)

गोळीबाराच्या संपूर्ण घटनेचे फेसबूक लाईव्ह प्रक्षेपण

पूर्व वैमनस्यातून मॉरिस (Morris) याने अभिषेक यांना कार्यालयात बोलावून अभिषेक यांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या गोळीबाराच्या संपूर्ण घटनेचे फेसबूक लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले आहे. अभिषेक घोसाळकर हे शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक असून शिवसेना नेते विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांचा मुलगा होता.

बोरिवली पश्चिम आय सी कॉलनी येथे रहाणारा गुंड प्रवृत्तीचा मॉरिस केणी याने गुरुवारी महिलांचा हळदी-कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना आमंत्रित केले होते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार अभिषेक हे मातोश्री येथे शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची सायंकाळी पाच वाजता भेट घेऊन आले होते.

(हेही वाचा – ग्रँड सेंट्रल पार्कची वैशिष्ट्ये)

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडून मॉरिसने स्वतःवर झाडल्या गोळ्या

मॉरिसने अभिषेक यांना त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले. त्यानंतर मॉरिसने जुने वैर विसरून एकत्र काम करू, असे बोलून फेसबुक लाईव्ह केले. त्यानंतर अभिषेक आणि मॉरिस यांच्यात एकत्र काम करण्याविषयी चर्चा सुरू होती. गरिबांना मदत करू, महिलांना साडीवाटपाचा कार्यक्रम एकत्र करू, हे सर्व फेसबुक लाईव्ह सुरू असताना मॉरिस हा अचानक उठला आणि त्याने कार्यालयाच्या अँटी चेंबर्स मध्ये जाऊन त्याने रिव्हॉल्वर आणले. फेसबुक लाईव्ह सुरू असतांनाच अभिषेक घोसाळकर यांच्यावर तीन गोळ्या झाडून अँटीचेंबर्समध्ये जाऊन मॉरिसने स्वतःवर चार गोळ्या झाडल्या.

दोघांचा मृत्यू 

गोळीबाराचा आवाज ऐकून कार्यकर्त्यांनी कार्यालयात धाव घेतली असता अभिषेक आणि मॉरिस हे दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. कार्यकर्त्यांनी दोघांना तातडीने करुणा या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात केले. या गोळीबारात मॉरिस याचा मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून अभिषेक यांचा देखील उपचारांदरम्यान मृत्यू झाला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

मॉरिसला बलात्कारामध्ये अटक झाली होती. त्यात अभिषेक यांनी महिला तक्रारदाराला मॉरिसच्या विरोधात तक्रार देण्यास सांगितले होते. त्याचा राग मॉरिसला होता, असे कळते. या घटनेनंतर बोरिवली एलआयसी कॉलनी, आयसी कॉलनी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलेला असून रुग्णालय परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली.  (Abhishek Ghosalkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.