Matunga Car Parking : माटुंग्यातील त्या वाहनतळाची जागा बदलणार का? रुईयासह पोद्दार कॉलेजमधील विद्यार्थ्यांची होणार गैरसोय

मुंबईतील वाहनतळांच्या अपुऱ्या संख्येमुळे अनेक वाहने रस्त्यांवर बेशिस्तपणे उभी केली जातात, परिणामी रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. तसेच रस्त्यांवर उभ्या केलेल्या वाहनांना टोविंग करत नेले जात असल्याने नागरिकांना होत असलेल्या या वाहनतळाच्या समस्येबाबत महापालिकेने आता अत्याधुनिक पध्दतीची वाहनतळे बनवण्याचा निर्णय घेतला.

1507
Matunga Car Parking : माटुंग्यातील त्या वाहनतळाची जागा बदलणार का? रुईयासह पोद्दार कॉलेजमधील विद्यार्थ्यांची होणार गैरसोय

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मुंबईतील माटुंगा पूर्व आणि मुंबादेवी मंदिर परिसरात अत्याधुनिक पध्दतीची एलिवेटेड मल्टीलेवल मॅकेनिकल कार पार्किंगची सुविधा उभारण्याचा निर्णय घेत कंत्राटदारांची निवड केली. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेमुळे मुंबादेवी येथील या कारपार्किंगची (Car Parking) जागा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यानंतर आता माटुंगा येथील कार पार्किंगलाही (Car Parking) स्थानिकांचा विरोध व्हायला सुरु झाला आहे. माटुंगा येथील प्रस्तावित वाहनतळामुळे रुईया व पोद्दार कॉलेज, वेलिंगकर कॉलेज यासह खालसा, व्हीजेटीआय आदी ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार असल्याने हा विरोध होत असल्याचे बोलले जात आहे. (Matunga Car Parking)

मुंबईतील वाहनतळांच्या अपुऱ्या संख्येमुळे अनेक वाहने रस्त्यांवर बेशिस्तपणे उभी केली जातात, परिणामी रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. तसेच रस्त्यांवर उभ्या केलेल्या वाहनांना टोविंग करत नेले जात असल्याने नागरिकांना होत असलेल्या या वाहनतळाच्या समस्येबाबत महापालिकेने आता अत्याधुनिक पध्दतीची वाहनतळे बनवण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये माटुंगा पूर्व रेल्वे स्थानकासमोरील मोकळी जागा, हुतात्मा चौक शेजारी जागा आणि काळबादेवी मुंबादेवी मंदिराजवळील मोकळी जागा निश्चित केल्या होत्या. त्यातील माटुंगा आणि मुंबादेवीच्या दोन जागा अंतिम करून त्याठिकाणी एलिवेटेड मल्टीलेवल मॅकेनिकल कार पार्किंगकरता (Car Parking) १६ जून २०२२ रोजी निविदा मागवल्या आणि दोन्ही कामांसाठी प्रत्येकी कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. (Matunga Car Parking)

New Project 2024 02 06T211558.730

(हेही वाचा – CM Eknath Shinde : श्री क्षेत्र पंढरपूर विकासासाठी परिपूर्ण आराखडा करावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश)

माटुंगा मध्य रेल्वेच्या समोरील १५१८ चौरस मीटरच्या मोकळ्या जागेत १८ मजली अशाप्रकारे ४७५ वाहनांची क्षमता असलेले वाहनतळ उभारले जाणार आहे, तर मुंबादेवी मंदिराजवळील मोकळ्या जागेतही १८ मजली ५४० वाहनांची क्षमता असलेले वाहनतळ उभारले जाणार आहे. यातील मुंबादेवी मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या वाहनतळाची जागा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता त्यापाठोपाठ माटुंगा येथील प्रस्तावित अत्याधुनिक वाहनतळाची जागा बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माटुंगा रेल्वे स्थानकाच्या दक्षिण दिशेला असलेल्या रेल्वे पादचारी पुलावरून बाहेर पडण्याचा मार्ग आहे, त्याच ठिकाणी महापालिकेचे वाहनतळ आहे. या मोकळ्या जागेत सध्या पोलिस चौकी असून रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारासमारेच हे वाहनतळ उभारले जाणार असल्याने या मार्गांतून बाहेर पडणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होण्याची शक्यता आहे. (Matunga Car Parking)

(हेही वाचा – Narendra Modi: ‘सपने नही हकिकत बुनते…’ गेल्या १० वर्षांतील मोदींच्या आश्वासनांवर आधारित फिल्म प्रदर्शित)

New Project 2024 02 06T211726.330

कुठल्याही प्रकारचा विरोध अद्याप महापालिकेकडे स्थानिकांनी नोंदवला नाही 

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, याच प्रवेशद्वारातून रुईया, पोद्दार महाविद्यालय, वेलिंगकर कॉलेज, खालसा कॉलेज, व्हीजेटीआय यासह स्थानिक रहिवाशी आणि कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होते. हा प्रवेशद्वारे थेट रस्त्याला जोडला जात असल्याने हा महत्वाच्या प्रवेशमार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर प्रस्तावित वाहनतळाच्या बांधकामालाच विरोध होत असून त्यामुळे याठिकाणच्या वाहतनळाची जागा बदलण्याचीही मागणी होत आहे. तसेच या आजुबाजुच्या इमारत पुनर्विकासात प्रकल्पांमध्ये वाहनतळ उपलब्ध होणार असून जर महापालिकेच्यावतीने वाहनतळ बांधल्यास विकासकाकडून वाहनतळाची जागा उपलब्ध होणार नसून वाहनतळाची आवश्यकता नसल्याने त्या जागेत विकासक सदनिकांचे बांधकाम केले जाईल अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. (Matunga Car Parking)

दरम्यान, या कामासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारालाच या वाहनतळाच्या बांधकामाच्या सर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार कंत्राटदाराकडून या सर्व परवानगी मिळवण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यातील रेल्वेची परवानगी येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये मिळण्याची शक्यता आहे. तसेच वाहतूक पोलिसांची परवानगी घेऊनच या जागेवर वाहनतळ बनवण्याचा आराखडा तयार केला होता, त्यामुळे सर्व प्रकारच्या शक्यता लक्षात घेऊन या वाहनतळाच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार असल्याचे रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. परंतु कुठल्याही प्रकारचा विरोध अद्याप महापालिकेकडे स्थानिकांनी नोंदवला गेलेला नाही, असे रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्षष्ट केले. (Matunga Car Parking)

(हेही वाचा – Creative Academy : क्रिएटिव्ह अकॅडमीच्या नौशाद शेखकडून विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, अश्लील चॅट, मारहाण आणि बरेच काही)

माटुंगा पूर्व, मध्य रेल्वे स्थानकासमोर

प्रस्तावित वाहनतळाची क्षमता : ४७५

वाहतळाचे बांधकाम : १८ मजले

बांधकामाचा कालावधी : पावसाळ्यासह १५ महिने

हमी कालावधी : ५ वर्षे

देखभाल कालावधी : पुढील २० वर्षे (Matunga Car Parking)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.