Narendra Modi: ‘सपने नही हकिकत बुनते…’ गेल्या १० वर्षांतील मोदींच्या आश्वासनांवर आधारित फिल्म प्रदर्शित

164
PM Narendra Modi : सीमावर्ती गावांच्या विकासाकडे यापूर्वी दुर्लक्ष

गेल्या 10 वर्षात पूर्ण झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आश्वासनांवर आधारित एका फिल्मचा भाजपकडून शुभारंभ करण्यात आला. तामिळ, तेलगु, मल्याळम, कन्नड, असामी, ओडिया, बंगाली आणि हिंदी या ८ भाषांमध्ये प्रदर्शित झालेली ही पहिलीच फिल्म असून ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुद्रा योजनेवर आधारित आहे. (PMMY)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकृत ट्विटर ‘X’द्वारे ही फिल्म शेअर केली आहे. ‘सपने नही हकीकत बुनते…तभी तो सब मोदी को चुनते है’, करोडो भारतीयांसाठी भाजपच्या 2024 वर्षातील विविध मोहिमा, निवडणुका याविषयी मोदी प्रेरणास्थान आहेत, असा संदेश देणारी ही फिल्म असून मोदींनी जनतेला याद्वारे आश्वासन दिले आहे. मुद्रा योजनेने केवळ उद्योजकतेलाच चालना दिली नाही तर कोट्यवधी लोकांच्या जीवनात आश्चर्यकारक बदल घडवून आणण्याचे काम केले आहे. या योजनेत आपल्या माता आणि भगिनींसह अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओ. बी. सी. समुदायातील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे हे पाहून मला खूप समाधान वाटते, असे मोदींनी म्हटले आहे.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : श्री क्षेत्र पंढरपूर विकासासाठी परिपूर्ण आराखडा करावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश)

तसेच पूर्वी, आज आणि आताची भावी पिढी म्हणजेच ‘अमृत पिढी’ची स्वप्नांबाबत मोदींनी जनतेला आश्वासित केले आहे. मुद्रा योजना, जन धन योजना, उज्ज्वला योजना, युपीआय डिजिटल पब्लिक इन्फ्रिस्ट्रक्चर (डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा) आणि पीएम आवास योजना मुद्रा योजनेच्या अंतर्गत, ४४ कोटींपेक्षा जास्त लोकांना तारणविरहित कर्जामुळे कोट्यवधी लहान उद्योजक सक्षम झाले आहेत, ज्यापैकी 70 टक्के महिला आहेत. नोकरी शोधणारेच आता नोकरी देणारे, ही आहे मोदींची हमी, अशा मथळ्याअंतर्गत हा व्हिडियो भाजपच्या अधिकृत ‘X’वर पोस्ट केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.