Maratha Reservation Survey : सलग दुसऱ्या दिवशीही सर्व्हर डाऊन

मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचे काम सध्या मुंबईत सुरु असून घरोघरी जावून प्रगणक आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या तसेच लाभ न घेणाऱ्यांची माहिती संकलित करत आहे. परंतु सलग दुसऱ्या दिवशीही सर्व्हर डाऊन असल्याचे प्रकार घडले आहे. त्यामुळे सर्वेक्षणाचे धिम्या गतीने होत आहे.

778
BMC : अखेर मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांची बदली, अभिजीत बांगर नवे अतिरिक्त आयुक्त
BMC : अखेर मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांची बदली, अभिजीत बांगर नवे अतिरिक्त आयुक्त

मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचे काम सध्या मुंबईत सुरु असून घरोघरी जाऊन प्रगणक आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या तसेच लाभ न घेणाऱ्यांची माहिती संकलित करत आहे. परंतु सलग दुसऱ्या दिवशीही सर्व्हर डाऊन असल्याचे प्रकार घडले आहे. त्यामुळे सर्वेक्षणाचे धिम्या गतीने होत आहे. दरम्यान, मुंबईत या सर्वेक्षणासाठी महापालिकेचे कर्मचारी घरोघरी जात असून या सर्व कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्राची पडताळणी करून त्यांना माहिती देत सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे. (Maratha Reservation Survey)

मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागर‍िकांच्या सर्वेक्षणाचे कामकाज मंगळवारी २३ जानेवारी २०२४ पासून सुरू झाले असून येत्या ३१ जानेवारी २०२४ पर्यंत हे सर्वेक्षण होणार आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार करण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणात महापालिकेचे सुमारे ३० हजार कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती जाणून घेत आहे. एका प्रगणकाच्या माध्यमातून १५० कुटुंबांची माहिती संकलित केली जाणार असून एकूण ३८ लाख कुटुंबांचा सर्वे केला जाणार आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी २ लाख ६५ हजार कुटुंबांचा सर्वे झाला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली आहे. (Maratha Reservation Survey)

मुंबई महापालिकेचे सुमारे ९२ हजार कर्मचारी, अधिकारी असून त्यातील सुमारे ३० हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांची या सर्वेसाठी प्रगणक म्हणून नियुक्ती झाली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना सात दिवसांमध्ये आपल्याला दिलेल्या प्रत्येक घरांचा सर्वे करणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या ऍप प्रणालीमध्ये ही सर्व माहिती संकलित केली जात असून ही सर्व माहिती सुरक्षित राहणार आहे. ही माहिती गुप्त राखली जाणार आहे, एवढेच नाही तर महापालिकेलाही या प्रणालीत हस्तक्षेप करत ही माहिती जाणून घेण्याचे कोणतेही अधिकार नसल्यानेही शिंदे यांनी स्पष्ट केले. (Maratha Reservation Survey)

(हेही वाचा – Mamata Banerjee : लोकसभा स्वबळावर लढवण्याची घोषणा केल्यावर काही तासांतच ममता बॅनर्जींच्या वाहनाला अपघात)

मुंबईत पहिल्याच दिवशी २ लाख ६५ हजार कुटुंबांचा सर्वे

त्यामुळे आयोगाच्या निर्देशानुसार हा सर्वे मुंबई महाराष्ट्रात होत असल्याने मुंबईतील जनतेने आपल्या घरी आलेल्या प्रगणकाच्या ओळखपत्राची पडताळणी करून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत ही माहिती देत सहकार्य करावे असे आवाहन शिंदे यांनी केले आहेत. त्यामुळे सात दिवसांमध्ये हे सर्वेक्षण पूर्ण केले जाईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे. जर कुटुंबातील व्यक्ती आरक्षणाचा लाभ घेत असेल तर प्रश्नावलीचा मारा कमी असेल, पण जर ते आरक्षणाचा लाभ घेत नसतील प्रश्न आणि उपप्रश्न अशाप्रकारे एकूण १८७ प्रश्नांची माहिती कुटुंबांतील सदस्यांना द्यावी लागेल. ज्यामध्ये सामाजिक, आर्थिक, आरोग्य, तसेच कुटुंब सदस्यांची माहिती जाणून घेत ऍपमध्ये अपलोड केली जाणार आहे. (Maratha Reservation Survey)

मुंबईत पहिल्याच दिवशी २ लाख ६५ हजार कुटुंबांचा सर्वे झाला असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. प्रत्येक दिवशी चार ते पाच लाख कुटुंबांचा सर्वे होणे अपेक्षित आहे, परंतु पहिल्या दिवशी केवळ २.६५ कुटुंबांचा सर्वे झाला, पहिल्या दिवशी ऍपमधील तांत्रिक दोष आणि त्यांचा सर्व्हर डाऊन असल्याने या सर्वेक्षणाचे काम धिम्या गतीने झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही प्रगणकांना याचा अनुभव आला. सर्व्हर डाऊन झाल्याने ऍपमध्ये कुटुंबांची माहिती अपलोड करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही सर्व्हर डाऊनचा फटका प्रगणकांना बसला आहे. आरक्षणाचा लाभ घेणारे कुटुंब असल्यास प्रगणकांची माहिती त्वरीत भरली जाते, परंतु आरक्षणाचा लाभ न घेणाऱ्या खुल्या प्रवर्गातील कुटुंबांची माहिती संकलित करून अपलोड करण्यास २५ ते ३० मिनिटांचा कालावधी लागतो. त्यामुळे दिवसाला ३५ ते ४० कुटुंबांचे टार्गेट सहज पूर्ण होत आहे. (Maratha Reservation Survey)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.