Mumbai Fire : गोरेगावमध्ये इमारतीच्या २५व्या मजल्यावर भीषण आग

 गोरेगाव पश्चिमच्या महेश नगरमधील गोविंदजी श्रॉफ मार्गावरील अनमोल प्राइड या इमारतीत संध्याकाळी ६.४० वाजता आग लागली. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

178
Mumbai Fire : गोरेगावमध्ये इमारतीच्या २५व्या मजल्यावर भीषण आग

मुंबईतील गोरेगाव परिसरातील एका उंच इमारतीला बुधवारी (२४ जानेवारी) संध्याकाळी आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. (Mumbai Fire)
गोरेगाव पश्चिमच्या महेश नगरमधील गोविंदजी श्रॉफ मार्गावरील अनमोल प्राइड येथे संध्याकाळी ६.४० वाजता ही आग लागली. सध्या ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Mumbai Fire)

(हेही वाचा : Maratha Reservation : मनोज जरांगेंना मुंबईत येण्यास रोखण्याला उच्च न्यायालयाचा नकार)

मुंबई अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार, आग २५ व्या मजल्यावरील बंद पेंट हाऊसमध्ये लागली आहे. इमारतीला लागलेल्या या आगीत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून अधिक तपास सुरू आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.