Maratha Reservation : जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत; बच्चू कडू यांचा दावा

Maratha Reservation : आता मराठा आरक्षणाचा ड्राफ्ट घेऊन आम्ही विभागिय आयुक्तांकडे जात आहोत. तिथून आम्ही मनोज जरांगेंना तो ड्राफ्ट देऊ, असे आमदार बच्चू कडू म्हणाले.

185
Maratha Reservation : जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत; बच्चू कडू यांचा दावा
Maratha Reservation : जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत; बच्चू कडू यांचा दावा

२० जानेवारी रोजी जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक मुंबईला (Mumbai) जाण्यासाठी निघणार आहेत. त्यापूर्वीच हा मोर्चा थांबविण्यासाठी राज्य सरकारची मोर्चेबांधणी चालू आहे. शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी मराठा आंदोलकांच्या मागण्यांवर तोडगा सापडल्याचा दावा केला आहे. (Maratha Reservation)

(हेही वाचा – MLA Disqulification Case : कंपाउंडर जेव्हा ऑपरेशन करतो, तेव्हा काय निकाल लागतो बघा; राहुल नार्वेकरांचा उद्धव ठाकरेंवर टोला )

मनोज जरांगेंना ड्राफ्ट देऊ

या विषयी बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ”१५ जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत (Eknath Shinde) चार तास चर्चा केली. यानंतर आता मराठा आरक्षणाचा ड्राफ्ट घेऊन आम्ही विभागिय आयुक्तांकडे जात आहोत. तिथून आम्ही मनोज जरांगेंना तो ड्राफ्ट देऊ. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. फक्त कुठे काना-मात्रा आदी राहिले असेल.”

किरकोळ गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया, मराठा आरक्षणाचे प्रमाणपत्र देण्यासाठी कॅम्प, ज्यांची नावे नोंदीत सापडली आहेत, त्यांची मराठीत माहिती गावोगावी लावणे आदी गोष्टी मान्य करण्यात आल्या असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

(हेही वाचा – Devendra Fadnavis : उबाठा सेनेने हिंदूंचा अपमान करणे बंद करावे; देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर)

…तर आंदोलन मागे घ्यावे

या वेळी बच्चू कडू यांनी ‘समाजाचे भले होत असेल, तर आंदोलन मागे घ्यावे’, असे आवाहन मनोज जरांगे यांना केले आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून बनवलेला मराठा आरक्षणाचा ड्राफ्ट (Draft of Maratha Reservation) जरांगे पाटलांना दाखवणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. (Maratha Reservation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.