Manipur Violence : मणिपूर अशांत क्षेत्र म्हणून घोषित करावे – आदिवासी एकता समिती

22
Manipur Violence : मणिपूर अशांत क्षेत्र म्हणून घोषित करावे - आदिवासी एकता समिती
Manipur Violence : मणिपूर अशांत क्षेत्र म्हणून घोषित करावे - आदिवासी एकता समिती

मणिपूरमधील सामान्य स्थिती पूर्ववत करण्याबाबत केलेल्या आपल्या आवाहनाबाबत केंद्र सरकार गंभीर असेल, तर त्यांनी ताबडतोब खोऱ्यातील सर्व जिल्हे अशांत क्षेत्र म्हणून घोषित करावे (Manipur Violence) आणि राज्यात सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा, १९५८ लागू करावा, अशी मागणी आदिवासी एकता समिति सदर हिल्सने (सीओटीयू) एका निवेदनाद्वारे केली आहे. मणिपूर मधील हिंसाचार अजून थांबण्याचे चित्र नाही. अशा स्थितीत या मागण्या करण्यात येत आहेत

(हेही वाचा – Mahalakshmi Devi Temple: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि जोतिबा मंदिरात नवे शस्त्रधारी सुरक्षारक्षक नकोत, उच्च न्यायालयाचे निर्देश)

याच प्रकरणी भाजपच्या २३ आमदारांनी राज्याच्या प्रादेशिक अखंडतेच्या रक्षणाचा संकल्प असलेल्या ठरावावर स्वाक्षरी केली. राज्यातील सध्याचे संकट दूर करण्याबाबत केंद्रीय नेतृत्वाचे मन वळवण्यासाठी लवकरात लवकर दिल्लीला जाण्याचे आश्वासनही आमदारांनी दिले. (Manipur Violence)

१२ सप्टेंबरला सकाळी ३ जणांची हत्या

अनुसूचित जमातीचा दर्जा मिळण्याच्या मैतेई समुदायाच्या मागणीला विरोध करण्यासाठी पर्वतीय जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मोर्चा’ आयोजित करण्यात आल्यानंतर ३ मे रोजी हिंसाचार उसळला होता. त्यानंतर आतापर्यंत हिंसाचारात १६० जणांनी प्राण गमावले आहेत. मणिपूरच्या लोकसंख्येत मैतेईंचे प्रमाण सुमारे ५३ टक्के असून ते प्रामुख्याने इम्फाळ खोऱ्यात राहतात. नागा आणि कुकी यांचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक असून ते पर्वतीय जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात १२ सप्टेंबरला सकाळी ३ जणांची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. कांगगुई भागातील इरेंग आणि करम वैफेई गावांदरम्यान सकाळी घटना घडली. कांगपोकपी येथील ‘कमिटी ऑन ट्रायबल युनिटी’ने या संघटनेने हल्ल्याचा निषेध केला आहे. ८ सप्टेंबर रोजीही तेंगनौपाल जिल्ह्यातील पल्लेल भागात उसळलेल्या हिंसाचारात तीन ठार तर ५० हून अधिक जखमी झाले आहेत.

हिंसाचारामुळे वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी नागरिकांनी दुप्पट मेहनत करावी – बिरेन सिंह

”मे महिन्यापासून वांशिक हिंसाचाराने ग्रस्त असलेल्या मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करणे आणि जनजीवन सुरळीत करण्याला सर्वाधिक प्राधान्य आहे. गैरसमजातून आणि पूर्वग्रहदूषित विचाराने राज्यातील शांतता भंग केली जात आहे. परदेशात रचलेल्या कारस्थानामुळे मणिपूरमध्ये हिंसाचार उसळत आहे. दुसऱ्या समुहाला नाराज करणाऱ्या टिप्पण्या किंवा चर्चा करणे सर्वांनी टाळावे. हिंसाचारामुळे वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी नागरिकांनी दुप्पट मेहनत करावी”, असे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी यापूर्वी राज्यातील जनतेला केले आहे. (Manipur Violence)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.