Mahalakshmi Devi Temple: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि जोतिबा मंदिरात नवे शस्त्रधारी सुरक्षारक्षक नकोत, उच्च न्यायालयाचे निर्देश

19
Mahalakshmi Devi Temple: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि जोतिबा मंदिरात नवे शस्त्रधारी सुरक्षारक्षक नकोत, उच्च न्यायालयाचे निर्देश
Mahalakshmi Devi Temple: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि जोतिबा मंदिरात नवे शस्त्रधारी सुरक्षारक्षक नकोत, उच्च न्यायालयाचे निर्देश

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर व जोतिबा मंदिरातील सुरक्षारक्षकांना काढून मंदिर ट्रस्टला त्यांच्या जागी आता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील शस्त्रधारी रक्षकांची नेमणूक करायची आहे. मात्र याला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

कोल्हापूरच्या अंबाबाई व दख्खनचा राजा जोतिबा मंदिरातील सध्याचे सुरक्षारक्षक काढून त्याजागी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे शस्त्रधारी सुरक्षा रक्षक तैनात केले जाणार होते, मात्र नव्या सुरक्षा रक्षकांना नियुक्त करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे.मंदिर ट्रस्टला जुने सुरक्षारक्षक काढून नवीन नेमणूक करण्यास दिलेली अंतरिम स्थगिती पुढील सुनावणीपर्यंत कायम असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे.

(हेही वाचा – Sanatan Dharma Defamation : सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी करणारे द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर ‘या’ राज्यांत गुन्हे दाखल)

महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियनचे रक्षक या दोन मंदिरांच्या सेवेत सन 2016 पासून तैनात आहेत. महालक्ष्मी मंदिरात 49, तर ज्योतिबा मंदिरात 10 सुरक्षारक्षक आहेत. या सुरक्षारक्षकांना काढून आता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील शस्त्रधारी रक्षकांची नेमणूक मंदिर ट्रस्टला करायची आहे. यासंदर्भातील पत्र त्यांनी महामंडळाकडे दिलेलं आहे. याविरोधात या सुरक्षारक्षकांनी अॅड. अविनाश बेळगे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

मंदिराला धोका आहे, आता जे सुरक्षारक्षक आहेत ते शस्त्रधारी नाहीत. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सुरक्षारक्षक शस्त्रधारी आहेत. त्यामुळे जुने सुरक्षारक्षक काढून महामंडळाच्या शस्त्रधारी रक्षकांची नेमणूक करण्यात येत आहे, असा युक्तिवाद ट्रस्टच्या वतीनं केला गेला आहे, मात्र याला याचिकाकर्त्यांनी विरोध केला आहे.‌ आता जे मंदिराची सुरक्षा बघतात त्यांची नेमणूक भाविकांना रांगेतून सोडण्यासाठी आणि त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी करण्यात आली आहे. परिणामी त्यांना सेवेतून काढता येणार नाही, असा दावा याचिकेतून केला गेला आहे. याची नोंद करून घेत उच्च न्यायालयाने मंदिर देवस्थान समितीला जुने सुरक्षारक्षक काढून नवीन नेमणूक करण्यास अंतरिम मनाई केली आहे, मात्र जुने सुरक्षारक्षक न काढता तुम्ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या शस्त्रधारी रक्षकांची नेमणूक करू शकता,असंही हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे. हे अंतरिम आदेश रद्द करावेत,अशी मागणी ट्रस्टनं हायकोर्टाकडे केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.