Mangal Prabhat Lodha हे शिक्षणमंत्री आणि शहराच्या पालकमंत्र्यांनाच विसरले

ही घोषणा करताना लोढा यांना शालेय शिक्षण मंत्री आणि शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचा विसर पडला. एका बाजुला युतीची भाषा करत असतानाच दुसरीकडे लोढा यांच्याकडून केसरकर यांना डावलले गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

769
Mangal Prabhat Lodha हे शिक्षणमंत्री आणि शहराच्या पालकमंत्र्यांनाच विसरले
Mangal Prabhat Lodha हे शिक्षणमंत्री आणि शहराच्या पालकमंत्र्यांनाच विसरले

मुंबईतील ११४६ शाळांमध्ये मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जीवन चरित्र स्पर्धा घेतली जाणार असून यामध्ये चित्रकला, निबंध, काव्य लेखन आणि नाट्य स्पर्धा आदींचा समावेश आहे. येत्या १० डिसेंबपासून या स्पर्धा होणार असून याची घोषणा उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी महापालिका मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली. परंतु ही घोषणा करताना लोढा यांना शालेय शिक्षण मंत्री आणि शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांचा विसर पडला. एका बाजुला युतीची भाषा करत असतानाच दुसरीकडे लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्याकडून केसरकर यांना डावलले गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Mangal Prabhat Lodha)

येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. त्या अनुषंगाने आपल्या पुढील पिढीला श्रीरामचंद्रांच्या आदर्श व्यक्तिमत्त्वाची आणि रामराज्याची माहिती व्हावी यासाठी येत्या १० ते १७ जानेवारी दरम्यान मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जीवन चरित्र स्पर्धा आपल्या संकल्पनेतून आयोजित करण्यात येत असल्याची घोषणा उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी केली आहे. यावेळी शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ हे उपस्थित होते. (Mangal Prabhat Lodha)

श्रीराम हे सर्व सामान्यासाठी एक आदर्श आहेत. रामाने आई वडिलांच्या आज्ञेचे सदैव पालन केले. आदर्श अशा बंधुप्रेमाला अजुनही राम लक्ष्मणाचीच उपमा देतात. श्रीराम राजधर्माचे पालन करणारे कुशल राज्यकर्ते होते असे अजुनही सुशासनाची उपमा देताना, असे म्हणतात. या स्पर्धेमुळे निबंध कविता लिहिताना, चित्र काढताना, नाट्य साकारताना या सर्व गोष्टींची माहिती मुलांना होईल. प्रभू श्रीरामांच्या जीवनातील ऐतिहासिक क्षणांचा मुलांवर सकारात्मक प्रभाव होईल. विद्यार्थ्यांना सकारात्मकता, निर्णय क्षमता, नियोजन कौशल्य, राजशास्त्र तसेच समरसता अशा विविध विषयांचे ज्ञान मिळेल असे पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. (Mangal Prabhat Lodha)

(हेही वाचा – ITI Mulund : कौशल्य विकास विभागाच्या मुंबईतील पहिल्या लाइटहाऊसचे उद्घाटन)

चित्रकला स्पर्धेसाठी असणारे हे विषय
  • माझ्या स्वप्नातील श्रीराम मंदिर
  • माझा सुपर हिरो वीर हनुमान
  • रावण वध
  • रामसेतू
निबंध स्पर्धेसाठी
  • आमचे आदर्श श्रीराम
  • मला कळलेले रामायण
  • माझा सुपर हिरो वीर हनुमान
  • रामसेतू
कविता लेखन स्पर्धेसाठी
  • श्रीराम चरित्र
  • श्री राम जन्म
नाट्य स्पर्धेसाठी
  • राम भरत बंधू प्रेम
  • शबरीची बोरे
  • राम सेतू
  • सीता हरण
  • रामायण मुख्य प्रसंगी (Mangal Prabhat Lodha)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.