ITI Mulund : कौशल्य विकास विभागाच्या मुंबईतील पहिल्या लाइटहाऊसचे उद्घाटन

निधी चौधरी म्हणाल्या, युवक आणि युवतींना इंग्रजी भाषा शिक्षण आणि डिजिटल साक्षरतेचे प्रशिक्षण लाइटहाऊस प्रकल्पाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. ही २१ व्या शतकातील अत्यंत गरजेची कौशल्ये आहेत. केवळ रोजगार देण्याऐवजी हा कार्यक्रम तरुणांना नोकरीत राहण्यास आणि करिअर घडविण्यास सक्षम करतो, असेही त्यांनी सांगितले.

211
ITI Mulund : कौशल्य विकास विभागाच्या मुंबईतील पहिल्या लाइटहाऊसचे उद्घाटन
ITI Mulund : कौशल्य विकास विभागाच्या मुंबईतील पहिल्या लाइटहाऊसचे उद्घाटन

मुलुंड (ITI) येथे कौशल्य विकास विभागाच्या मुंबईतील पहिल्या लाइटहाऊसचे उद्घाटन मंगळवारी (०९ जानेवारी) कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी (Nidhi Chaudhary) यांच्या हस्ते करण्यात आले. ‘हा लाइटहाऊस प्रकल्प दीपस्तंभाप्रमाणे काम करेल. कोणत्याही पदवीबरोबरच जागतिक बाजारपेठेत आवश्यक कौशल्य विकसित होणे अत्यंत गरजेचे आहे. हा फाऊंडेशन कोर्स आधुनिक काळातील कौशल्य विकासासाठी महत्वाची भूमिका बजावेल’, असे प्रतिपादन चौधरी यांनी यावेळी केले. (ITI Mulund)

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्यामार्फत मुलुंडमध्ये मुंबईतील पहिले लाइटहाऊस उभारण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी आयुक्त चौधरी यांच्या समवेत व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, महाराष्ट्र कौशल्य विकास मंडळाचे संचालक योगेश पाटील, लाइटहाऊस कम्युनिटीजचे चेअरमन डॉ. गणेश नटराजन, इक्लर्क्सला सर्व्हिसेस लिमिटेडचे सह-संस्थापक आणि कार्यकारी अधिकारी पी. डी. मुंद्रा, लाइटहाऊस कम्युनिटीजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुची माथूर उपस्थित होते. (ITI Mulund)

(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : आम्ही राम मंदिराचे राजकारण करीत नाही)

यावेळी निधी चौधरी (Nidhi Chaudhary) म्हणाल्या, युवक आणि युवतींना इंग्रजी भाषा शिक्षण आणि डिजिटल साक्षरतेचे प्रशिक्षण लाइटहाऊस प्रकल्पाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. ही २१ व्या शतकातील अत्यंत गरजेची कौशल्ये आहेत. केवळ रोजगार देण्याऐवजी हा कार्यक्रम तरुणांना नोकरीत राहण्यास आणि करिअर घडविण्यास सक्षम करतो, असेही त्यांनी सांगितले. तर, संचालक दिगंबर दळवी म्हणाले की, गेल्या वर्षी लाइटहाऊस प्रकल्प सुरू करण्याबाबत सामंजस्य करार झाला आणि मंगळवारी या प्रकल्पाची अंमलबजावणी झाली. आयटीआयमध्ये (ITI) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रकल्पाचा मोठा फायदा होईल. (ITI Mulund)

३ हजार चौरस फूट क्षेत्रात उभारणी

मुंबईतील हा पहिला लाइटहाऊस प्रकल्प मुलुंड आय. टी. आयमध्ये (ITI Mulund) ३ हजार चौरस फूट क्षेत्रात उभारण्यात आला आहे. त्यात विविध वर्ग खोल्या तयार करण्यात आल्या असून, खजाना, कट्टा, टेक-हब आणि क्लासरूमचा त्यात समावेश आहे. या प्रकल्पामार्फत युवकांना विविध कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास विकासावर भर देण्यात येणार आहे. मुलुंड (Mulund) लाइटहाऊसमध्ये कमी उत्पन्न गटातील १८ ते ३५ वर्षे वयोगटातील युवक आणि युवतींना माहिती, करिअर समुपदेशन, व्यावसायिक कौशल्ये देण्यात येत असून, नोकरी मिळवण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. लाइटहाऊस हा उपक्रम भारतातील ४ राज्यांमध्ये आणि १० शहरांमध्ये सुरू आहे. तो सार्वजनिक खासगी भागिदारी तत्त्वावर चालवला जातो, अशी माहिती यावेळी देण्यात आली. (ITI Mulund)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.