Malegaon conversion : करिअर मार्गदर्शनाच्या नावाखाली महाविद्यालयात धर्मांतराचा प्रकार; प्राचर्यांचे निलंबन

मालेगावच्या महाराज सयाजीराव गायकवाड आर्ट्स, सायंन्स अँड कॉमर्स कॉलेजचे संचालन ठाकरे गटाचे नेते डॉ. अपूर्व हिरे यांच्याकडे आहे.

183
Malegaon conversion : करिअर मार्गदर्शनाच्या नावाखाली महाविद्यालयात धर्मांतराचा प्रकार; प्राचर्यांचे निलंबन

राज्यात अहमदनगर, कोल्हापूरसह इतर ठिकाणी धार्मिक तणावाच्या घटना घडत असतानाच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon conversion) येथील महाराज सयाजीराव गायकवाड आर्ट्स, सायंन्स अँड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांचे धर्मांतराच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे. तसेच डॉ. निकम यांच्या विरोधात एफआयआर देखील दाखल करण्यात आली आहे.

मालेगावच्या महाराज सयाजीराव गायकवाड आर्ट्स, सायंन्स अँड कॉमर्स कॉलेजचे संचालन ठाकरे गटाचे नेते डॉ. अपूर्व हिरे यांच्याकडे आहे. हिंदुत्ववादी संगटनांकडून या सेमिनारच्या आयोजनाल विरोध करण्यात आला तसचे आरोप करण्यात आला की, विद्यार्थ्यांना इस्लामकडे (Malegaon conversion) आकर्षित केले जात आहे. यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर मंत्री दादा भुसे यांनी देखील या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

(हेही वाचा – Malegaon conversion : करिअर मार्गदर्शनाच्या नावाखाली धर्म परिवर्तनाचे धडे; शहरात तणावाचे वातावरण)

हिरे कुटुंबियांकडून सांचलित या महाविद्यालयात संरक्षण क्षेत्रातील संधी यांसंबंधी एक करियर गायडन्स काउंसिलिंग प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम स्थानिक संघटना सत्य मलिक लोक सेवा समूह यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. त्यांनी पुण्यातील अनीस डिफेंस करियर इंस्टीट्यूट चे अनीस कुट्टी यांना कॉलेजमध्ये निमंत्रीत केले होते. या प्राचार्यांवर काँलेजमध्ये करियर गायडन्स सेमिनारच्या आड विद्यार्थांना इस्लामकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या सेमिनारची सुरूवात एखा एस्लामिक प्रार्थनेने (Malegaon conversion) झाली होती असाही आरोप करण्यात आला आहे.

निलंबीत प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी सांगितले की, कार्यक्रमची सुरूवात एका छोट्या इस्लामिक प्रार्थानेने (Malegaon conversion) करण्यात आली, त्यानंतर वक्त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. कार्यक्रम संपतेवेळी मोठ्या संख्येने लोक हॉलमध्ये घुसले आणि दावा करू लागले की हा कार्यक्रम इस्लामच्या प्रचाराचा प्रयत्न आहे. ही संघटना त्यांच्या इतरही सर्व कार्यक्रमाची सुरूवात याच प्रकारे करत असल्याचे निकम यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.