Malegaon conversion : करिअर मार्गदर्शनाच्या नावाखाली धर्म परिवर्तनाचे धडे; शहरात तणावाचे वातावरण

पोलिसांनी कारवाई करत महाविद्यालय प्रशासन, उपप्राचार्यासह आयोजकांवर गुन्हा दखल केला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.

162
Malegaon conversion : करिअर मार्गदर्शनाच्या नावाखाली महाविद्यालयात धर्मांतराचा प्रकार; प्राचर्यांचे निलंबन

गेल्या काही महिन्यांपासून देशात ‘लव्ह जिहाद’, ‘हनी ट्रॅप’, ‘लँड जिहाद’, ‘गेम जिहाद’ अशा अनेक प्रकारच्या जिहादाची प्रकरणे समोर आली आहेत. अशातच मालेगावात (Malegaon conversion) करिअर मार्गदर्शनाच्या नावाखाली एका संस्थेकडून धर्मांतराचा प्रयत्न करण्यात आला. सध्या मालेगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रविवार ११ जून रोजी हा प्रकार घडला. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. यानंतर पोलिसांनीही कारवाई करत महाविद्यालय प्रशासन, उपप्राचार्यासह आयोजकांवर गुन्हा दखल केला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. शहराचे पालकमंत्री दादा भुसे यांनी या आरोपाची गांभीर्याने दखल घेतली आहे.

मालेगावच्या (Malegaon conversion) महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात पुण्यातील ‘सत्य मलिक लोक सेवा ग्रुप’ कडून अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर गाईडन्स’ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात इतर धर्मीय मुलांनाही मुस्लिमांप्रमाणे शिक्षण करण्याचे आमिष दाखवल्याचा आरोप झाला. यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी कार्यक्रमस्थळी धाव घेत कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला.

(हेही वाचा – Love Jihad : …तरीही म्हणतात, ‘मेरा अब्दुल वैसा नहीं है’)

विद्यार्थ्यांकडून घोषणाबाजी

मालेगावात (Malegaon conversion) रविवारी झालेल्या घटनेचे पडसाद दुसऱ्यादिवशी म्हणजेच १२ जून रोजी उमटले. सोमवारी विद्यार्थी रस्त्यावर येत महाविद्यालयाच्या बाहेर विद्यार्थी आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मालेगाव कॉलेज रोडवर विद्यार्थ्यांनी जोरदार घोषाणाबाजी करत कारवाईची मागणी केली.

या सर्व प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून गुन्हा दाखल (Malegaon conversion) करण्यास उशीर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात सुमारे दोन तास ठाण मांडत या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.