Online Gaming : आता ‘या’ प्रकारचे ऑनलाईन गेम होणार बंद; केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांची घोषणा

ऑनलाईन गेमिंगबाबत सरकारने प्रथमच नियमावली तयार केली आहे.

140
Online Gaming : आता 'या' प्रकारचे ऑनलाईन गेम होणार बंद; केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांची घोषणा

सध्या देशातील तरुण पिढी ऑनलाईन गेमच्या (Online Gaming) आहारी जात आहे तर दुसरीकडे याच गोष्टीचा फायदा घेऊन काही भागात तरुणांचे धर्मांतर केले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता तीन प्रकारचे ऑनलाईन गेम बंद करण्यात आले आहेत.

देशात अनेक जण ऑनलाईन गेमिंगच्या (Online Gaming) आहारी गेल्याची प्रकरणे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने तीन प्रकारच्या गेमवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोमवारी (१२ जून) केली. जी-२० डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या तिसऱ्या परिषदेत माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की सरकारने सर्वांशी सल्लामसलत करून नवीन आराखडा तयार केला आहे. विशिष्ट प्रकारच्या तीन प्रकारात मोडणाऱ्या गेमवर बंदी घातली जाणार आहे. यात सट्टा लावण्यात येणाऱ्या, वापरकर्त्यासाठी हानिकारक असलेल्या आणि व्यसन लागू शकेल अशा तीन प्रकारच्या गेमचा समावेश आहे.

(हेही वाचा – Malegaon conversion : करिअर मार्गदर्शनाच्या नावाखाली धर्म परिवर्तनाचे धडे; शहरात तणावाचे वातावरण)

गेमिंगच्या माध्यमातून (Online Gaming) कथित धर्मांतर झाल्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर चंद्रशेखर बोलत होते. ते म्हणाले,की ऑनलाईन गेमिंगबाबत सरकारने प्रथमच नियमावली तयार केली आहे. यानुसार तीन प्रकारच्या गेमला देशात परवानगी असणार नाही. याबाबत सरकारी पातळीवर कोणतेही दुमत नाही.

त्यामुळे आता सट्टा लावण्यात येणाऱ्या, वापरकर्त्यासाठी हानिकारक असलेल्या आणि व्यसन लागू शकेल अशा तीन प्रकारच्या गेमवर बंदी (Online Gaming) घालण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.