Love Jihad : …तरीही म्हणतात, ‘मेरा अब्दुल वैसा नहीं है’

श्रद्धा वालकर आणि दिल्लीमधील साक्षी मर्डर केसमुळे या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे.

162
Love Jihad : ...तरीही म्हणतात, ‘मेरा अब्दुल वैसा नहीं है’

श्रुतिका कासार

गेल्या काही महिन्यांपासून देशात ‘लव्ह जिहाद’, (Love Jihad) ‘हनी ट्रॅप’, ‘लँड जिहाद’, ‘गेम जिहाद’ अशा अनेक प्रकारच्या जिहादाची प्रकरणे समोर आली आहेत. अशातच श्रद्धा वालकर आणि दिल्लीमधील साक्षी मर्डर केसमुळे या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. वारंवार असे प्रकार समोर येत असूनही हिंदू मुली मुस्लिमांच्या जाळ्यात अडकत आहेत. आजूबाजूला सारे काही स्पष्ट दिसत असतानाही डोळे झाकून या मुली मुस्िलमांवर विश्वास ठेवतात. लव्ह जिहाद रोखण्यात खरे तर हेच एक मोठे आव्हान आहे.

जिहाद म्हणजे नेमके काय?

‘जिहाद’ (Love Jihad) हा मुळात अरबी शब्द आहे. ‘स्वतःमधील वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी चालू केलेला प्रयत्न’, म्हणजे जिहाद असा त्याचा अर्थ सांगितला जातो. इस्लाममध्ये ‘जिहाद’ या शब्दाला फार पवित्र मानलं जातं. मात्र सध्या जिहादच्या नावाखाली ज्या गोष्टी घडत आहेत त्या पाहून या शब्दाला कशाच्या आधारे पवित्र म्हटले जाते हा एक मोठा प्रश्नच आहे.

सर्वसामान्य भाषेत सांगायचे झाले तर, मुस्लिम पुरुषांनी प्रेमाच्या जाळ्यात अडकवून हिंदू मुलींचे धर्मांतर करण्याच्या कटाला लव्ह जिहाद (Love Jihad) असे म्हणतात. स्लीपर सेल्सप्रमाणेच लव्ह जिहाद हा सुद्धा संपूर्ण भारतात विषाप्रमाणे पसरत चालला आहे. ही मंडळी तरुण, नुकत्याच वयात आलेल्या मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला लग्नाची स्वप्न दाखवून नंतर धर्मांतर करण्यास भाग पाडतात. बहुतेक मुली खूप कोवळ्या वयात भावनेच्या भरात त्यांच्या प्रियकरांच्या मानसिक छळाला बळी पडून मग नंतर धर्मांतराचा निर्णय घेतात. तेव्हा त्यांना सांगितले जाते की, ‘तुम्हाला निकाहपुरता धर्म बदलायचा आहे. एकदा का लग्न झाले की मग ती मुलगी आपापल्या मूळ धर्माच्या चालीरीती पाळू शकते. त्या वेळेला ती मुलगी खूप दबावाखाली असते, तिच्या घरून तर अशा लग्नाला बहुधा विरोधच असतो, त्यामुळे पळून जाऊन लग्नाचा आततायी निर्णय ती मुलगी घेते. मग निकाह करून नवऱ्याची मर्जी सांभाळत बसण्याखेरीज तिच्याकडे दूसरा कुठलाच पर्याय उरत नाही. त्यामुळे नंतर त्या मुली मुस्लिम मुलांच्या अत्याचाराला बळी पडतात. या मधल्या काळात त्या मुलींचे अगदी व्यवस्थित ब्रेन वॉश केले जाते. त्या स्वतंत्र विचार करण्याची आपली कुवत गमावून बसतात.

(हेही वाचा – Monsoon : मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण, जाणून घ्या राज्यात केव्हा बरसणार मान्सून सरी?)

लव्ह जिहाद (Love Jihad) हे प्रकरण काही नवीन नाही. २०१० मध्ये केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि कम्युनिस्ट नेते अच्युतानंदन यांनीही कडव्या इस्लामी संघटना ‘मॅरेज अँड मनी’ म्हणजेच ‘लग्न आणि पैसा’ ही दोन शस्त्रे वापरून केरळचे इस्लामीकरण करत आहेत असा आरोप केला होता.

२०१९ ते जानेवारी २०२३ पर्यंत दिल्लीमध्ये ५, उत्तरप्रदेशमध्ये १८, महाराष्ट्रात ७, पश्चिम बंगाल २, झारखंड ६, उत्तराखंड ५, हरियाणा ३, राजस्थान २, हिमाचल प्रदेश १, छत्तीसगढ ३, आसाम १, आंध्रप्रदेश येथे १ , मध्य प्रदेश २, बिहार २, पंजाब १ आणि तेलंगणा येथे १ अशी लव्ह जिहादची प्रकरणे समोर आली आहेत.

मात्र इतके सगळे होऊनदेखील अनेक मुली ‘मेरा अब्दुल वैसा नहीं है’, असे म्हणताना दिसतात. तेव्हा मात्र नेमकी चूक कोणाची; खोटी आश्वासने देऊन, आपण हिंदू आहोत असे खोटे सांगून निष्पाप मुलींची फसवणूक करणाऱ्यांची की त्या मुलांवर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या मुलींची? या सगळ्या गोष्टींवर आताच आवाज उठवला नाही तर पुढे परिस्थिती खूप हाताबाहेर जाईल. त्यामुळे वेळीच या गोष्टी थांबवायला हव्यात. आपल्या मुलींना या सर्व गोष्टींपासून सावध करणे गरजेचे आहे. त्यासाठी मुळात पालकांनी, शिक्षकांनी या सगळ्या प्रकाराकडे गांभीर्याने पाहायला पाहिजे. नवीन पिढी घडवतांना तिच्यावर चांगले संस्कार करायला हवेत. नक्की प्रेम म्हणजे काय, आकर्षण म्हणजे काय? तसेच तरुणांना हिंदू धर्माची ओळख करून दिली पाहिजे. आपल्या धर्माचा, संस्कृतीचा अभिमान बाळगायला शिकवले पाहिजे.

लव्ह जिहादविरुद्ध (Love Jihad) कायदा हवा : उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रात देखील लव्ह जिहाद विरुद्ध कायदा व्हावा यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.

काही राज्यांनी लागू केलेल्या लव्ह जिहाद (Love Jihad) विरोधी कायद्यातील मुद्दे

– लव्ह जिहादच्या उद्देशाने केलेला विवाह हा अमान्य ठरवून त्या मुलाला १० वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
– जबरदस्तीने धर्मांतर केल्यास १-५ वर्षांच्या तुरुंगवासासह १५,००० रुपये दंडाची शिक्षा होवू शकते.
– मुलगी अल्पवयीन असल्यास किंवा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीची असल्यास, ३ वर्षे ते १० वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि २५,००० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
– तसेच धर्मांतरासाठी मदत करणाऱ्या संस्थांना ३-१० वर्षांचा तुरुंगवास आणि ५०,००० रुपयांचा दंड ठोठावला जाईल.
– जर एखाद्याला लग्नानंतर स्वेच्छेने धर्म बदलायचा असेल तर दोन महिने आधी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावा लागेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.