Jihad : जिहादी मानसिकता आणि मुस्लिम

लँड जिहाद, थूक जिहाद, लव्ह जिहाद, हे कमी होते म्हणून की काय गेम जिहाद सुरु झाला आहे.

128
Jihad : जिहादी मानसिकता आणि मुस्लिम

सध्या जिहाद (Jihad) हा शब्द वारंवार चर्चेला येत आहे. निरनिराळ्या स्वरूपात तो समोर येत आहे. लँड जिहाद, थूक जिहाद, लव्ह जिहाद, हे कमी होते म्हणून की काय गेम जिहाद सुरु झाला आहे. या सर्व जिहादी वृत्तीचा एकच धागा आहे. तो म्हणजे मुसलमानेतर यांचा द्वेष करणे. यातून काही धर्मांध वृत्तीचे मुस्लिम तरुण अत्यंत क्रूर कृत्य करत आहेत. वसईत राहणारी श्रद्धा वालकर हिला आफताबने दिल्लीत नेऊन तिथे तिचे ३५ तुकडे करून तिची निर्घृण हत्या केली आणि लव्ह जिहाद विषय आणखी उजेडात आला. त्या घटनेनंतर दिवसागणिक लव्ह जिहादची प्रकरणे उघड होऊ लागली आहेत.

मोबाइल गेम अॅपच्या माध्यमातून केले धर्मांतर

उत्तर प्रदेशात गाझियाबाद पोलिसांनी शाहनवाज मकसूद खान याला अटक केली. त्याने तीन हिंदू आणि एका जैन मुलाचे इस्लाममध्ये धर्मांतर केले. त्यांचे ब्रेनवॉश करून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. यामध्ये धर्मांतराची आणखी प्रकरणे समोर येऊ शकतात. अशा प्रकारे या गेम जिहाद (Jihad) प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलांच्या धर्मांतराचा मोठा आकडा समोर येऊ शकतो. गेम जिहादमध्ये हिंदू, जैन तरुणांना फोर्टनाइट नावाच्या व्हिडिओ गेमद्वारे आमिष दाखवण्यात आले. यामध्ये अल्पवयीन मुलांना लक्ष्य केले जाते. आरोपी तरुणांना बड्डो नावाच्या ग्रुपशी ऑनलाइन जोडत असे. शाहनवाज मकसूद खान हा ही ऑनलाइन साइट चालवायचा. या साईटच्या माध्यमातून मुलं शाहनवाजच्या नियमित संपर्कात असायची. काही मुस्लिम तरुणांनी त्यांची नावे हिंदू ठेवून ते जाणीवपूर्वक या साईटवर यायचे आणि खऱ्या हिंदू मुलांना फसवण्यासाठी मदत करायचे. ही मुसलमान मुले हिंदू आणि जैन तरुणांसोबत ऑनलाइन फोर्टनाइट गेम खेळायचे. जर हिंदू किंवा जैन मुले हरली तर त्यांना पुढील गेम जिंकण्यासाठी इस्लामिक धर्मग्रंथातील आयते पाठ करण्यास सांगायचे. त्यातून त्या मुलांचा इस्लामवरील विश्वास वाढायचा. दुसऱ्या टप्प्यात, मुलांना इस्लाम स्वीकारण्याचे आमिष दाखवले जायचे. तिसऱ्या टप्प्यात, शाहनवाज मकसूद खान त्या हिंदू मुलांना २०१५ पासून फरारी इस्लामिक दहशतवादी झाकीर नाईकचे व्हिडिओ पाहायला पाठवायचा. जेणेकरून या मुलांचे ब्रेनवॉश व्हायचे. यानंतर त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले जायचे. त्यानंतर तबलीगी जमातच्या तारिक जमीलचा व्हिडिओ त्यांना पाठवण्यात यायचा, जेणेकरून ती हिंदू मुले कट्टरवादी बनत.

(हेही वाचाAmerica : अमेरिका भारताला देणार नाटो देशांचे तंत्रज्ञान; भारत-अमेरिका संबंधांचे नवे युग)

महाराष्ट्रात अत्याचारी औरंग्या बनतोय रोल मॉडेल
जिहादी (Jihad) मानसिकता असल्यामुळे काही मुस्लिम तरुणांचे रोल मॉडलही तसेच बनत चालले आहेत. देशावर मुसलमान आक्रमणकर्त्यांनी आक्रमणे करून येथील भूप्रदेश बळकावले. त्यातील एक असे करणारा औरंगजेब हा होता. ज्याने त्याच्या राजवटीत लक्षावधी हिंदूंचे धर्मांतर केले. हिंदूंची मंदिरे तोडली, हिंदू महिलांवर अत्याचार केले, हिंदू महिलांना त्याच्या जनानखान्यात ठेवले. तो औरंगजेब आजच्या मुसलमान तरुणांचा रोल मॉडेल बनत आहे. म्हणूनच अहमदनगरमध्ये उरुसाच्या मिरवणुकीत एमआयएमच्या शहराध्यक्षाने औरंगजेबाचा फोटो झळकवल्याचा प्रकार समोर आला. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यावर खळबळ उडाली. एमआयएमचे शहराध्यक्ष सरफराज जहागीरदार हा औरंगजेबाचा फोटो घेऊन उरुसामध्ये नाचला होता. याआधीही एमआयएमच्या सभेत छत्रपती संभाजीनगर येथे औरंग्याचा फोटो झळकला होता. एमआयएमचे नेते अकरुद्दीन ओवैसी जेव्हा छत्रपती संभाजी नगर येथे आले होते, तेव्हा त्यांनी औरंग्याच्या थडग्याचे दर्शन घेतले होते. औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर एक आठवड्याने एमआयएम पक्षाने नामांतर विरोधी आंदोलनाला सुरुवात केली. खासदार इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या आंदोलनात दुपारच्या वेळी काही कार्यकर्त्यांनी औरंगजेबाचे पोस्टर हातात घेऊन घोषणाबाजी केली होती. अशा प्रकारे आजही मुसलमान तरुण औरंगजेब याला रोल मॉडेल मानत आहेत. कोल्हापुरात व्हाॅट्सअप स्टेटसवर काही धर्मांधांनी औरंग्या व टिपू सुलतानचे फोटो लावले, त्यामुळे तिथे दंगल झाली.

हिंदू असल्याचे खोटे सांगून केले अत्याचार

उत्तर प्रदेशात अबिद नावाच्या धर्मांध मुसलमान (Jihad) तरुणाने स्वतःचे नाव अनिकेत असे सांगत हिंदू असल्याचे भासवले आणि हिंदू तरुणीला फसवले. तिचे जबरदस्तीने धर्मांतर करायला लावले, तसेच त्याच्या वडिलांशी सेक्स करायला लावले. त्याने या मुलीशी ओळख वाढवली, ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. पीडित मुलीसोबत शरीरसंबंध ठेवले. त्याने या मुलीला लग्नाचे वचन दिले होते. त्यानंतर तो तिला ब्लॅकमेल करु लागला. तुझे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी तो तिला देत होता. ही घटना उत्तर प्रदेशातल्या बरेलीमध्ये घडली. त्या तरुणीला कोंडून ठेवले होते. तिने कशीबशी स्वतःची सुटका करुन घेतली.

मुसलमान पोलीस हवालदारनेच केला लव्ह जिहाद

दिल्ली पोलीस हवालदार वसीमवर उत्तर प्रदेशातील हापूर येथील एका महिलेने लव्ह जिहाद, (Jihad) धर्मांतर आणि लैंगिक शोषणाचे आरोप केले. महिलेचा आरोप होता की, वसीम गेल्या ११ वर्षांपासून तिच्यावर बलात्कार करत होता. यादरम्यान वसीमचा भाऊ आरिफनेही तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. वसीम पीडितेला श्रद्धा वालकर हिच्यासारखी ठार करेन अशी धमकी देत होता. पीडितेचे म्हणणे हाेते की, ती २०११ मध्ये शिक्षणासाठी दिल्लीत आली होती. येथे ती तिच्या कुटुंबासोबत लाजपत नगर येथील फ्लॅटमध्ये राहत होती. दिल्ली पोलीस हवालदार वसीम आणि त्याचे कुटुंबीयही याच इमारतीत राहत होते. वसीमची आई जमिला तिच्याशी गोड बोलायची आणि इस्लामची स्तुती करायची. पीडितेचे म्हणणे आहे की, एके दिवशी वसीमची आई जमीला तिला तिच्या घरी घेऊन गेली. तिथे जमिलाने तिला शेवया खायला दिल्या. शेवया खाल्ल्यानंतर तिला नशा चढली. यानंतर वसीमने तिच्यावर बलात्कार केला. ती शुद्धीवर आल्यावर जमिलाने वसीमशी लग्न करण्यासाठी तिच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. पीडितेने पुढे म्हटले आहे की, धर्म वेगळा असल्याने लग्नास मी नकार दिल्यावर वसीम आणि जमीला यांनी मला धमक्या देण्यास सुरुवात केली. यानंतर वसीमच्या कुटुंबीयांनी तिचे अनेकवेळा शोषण केले. २८ डिसेंबर २०१२ रोजी तिचा वसीमसोबत जबरदस्तीने विवाह करण्यात आला. हा प्रकार पीडितेच्या कुटुंबीयांना कळल्यावर ते बदनामीच्या भीतीने इतरत्र राहू लागल्याचे पीडितेने सांगितले. लग्नानंतर वसीम आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला अनेक कागदपत्रांवर सह्या करायला लावल्या. यानंतर तिचे नाव बदलून इक्रा अहमद ठेवले. एप्रिल २०१५ मध्ये पीडितेने मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर वसीमचे अत्याचार वाढले. वसीम तिला पावडर आणि ड्रग्ज खाऊ घालायचा आणि तिच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवायचा. वसीमच्या सांगण्यावरून तिचा भाऊ आरिफही तिच्यावर बलात्कार करायचा. वसीमने तिला इतर हिंदू मुलींनाही असेच फसवल्याचे सांगितले.

साहिलने अल्पवयीन हिंदू तरुणीला ठेचून मारले
देशाची राजधानी शाहबाद डेअरी परिसरात एका १६ वर्षीय हिंदू तरुणीची धर्मांध मुसलमान (Jihad) युवकाने वार करून रस्त्याच्या मधोमध हत्या केली. आरोपीचे नाव साहिल आहे. साहिल फ्रीज आणि एसी दुरुस्तीचे काम करतो. साहिलच्या वडिलांचे नाव सरफराज आहे. हिंदू पीडित मुलगी मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला जाताना वाटेत साहिलने मुलीला अडवून तिच्यावर चाकूने २० वार केले, त्यानंतर तिला दगडाने ठेचले. पोलिसांनी साहिलला अटक केली. त्याला त्याच्या कृत्याचा पश्चाताप वाटत नाही. या हल्ल्यात त्या पीडित तरुणीच्या पोटातील आतडे बाहेर आले, कवटीचे चार तुकडे झाले.

अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण करून केला निकाह

पुण्यात २० मे रोजी पोलिसांनी मंचर शहरातील एका अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिच्याशी जबरदस्तीने लग्न केल्याप्रकरणी जावेद शेख (Jihad) नावाच्या २२ वर्षीय तरुणाला अटक केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसीच्या अंतर्गत कलम ३६३ आणि ३७६ आणि पॉक्सो अंतर्गत कलम ४, ६, ८ आणि १० अंतर्गत गुन्हा दाखल केला. पीडिता १६ वर्षांची असताना तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पीडित मुलीने सांगितले की, जावेद आणि त्याचे कुटुंबीय तिला मारहाण करायचे. तिच्यावर बलात्कार केला गेला आणि काही महिने एका अपार्टमेंटमध्ये बंदिस्त केले गेले. २० मे रोजी कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली की जावेदने २०१९ मध्ये त्यांच्या मुलीचे अपहरण केले होते. जावेदने पीडित मुलीला लग्न करण्याचे वचन दिले आणि नंतर तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. बलात्कार केला. आरोपी जावेदने डिसेंबर २०२० मध्ये इस्लामिक रितीरिवाजांनुसार मुलीशी लग्न केले होते, निकाहनामानुसार मुलीचे वय १८ आणि जावेदचे वय २१ असे नमूद करण्यात आले आहे. दुसरीकडे दोघांच्या आधारकार्डनुसार पीडित मुलीचा जन्म २००२ मध्ये तर आरोपी जावेदचा जन्म २००१ मध्ये झाला होता. विवाह वैध करण्यासाठी निकाहनाम्यात मुलीचे वय १८ वर्षे, आरोपीचे वय २१ वर्षे दाखविण्यात आले आहे, तर आधारकार्डनुसार तो त्यावेळी १९ वर्षांचा होता. भारतात कायदेशीररित्या लग्न करण्यासाठी मुलाचे वय २१ वर्षे असणे आवश्यक आहे. यासोबतच निकाहनाम्यात असेही म्हटले आहे की, मुलगा आणि मुलगी लग्न करणाऱ्या दोघांचा धर्म इस्लाम आहे. पीडित मुलीने दावा केला की, ‘त्यांनी माझा छळ केला. मला फक्त मारहाणच झाली नाही तर पेटलेल्या सिगारेटनेही चटके देण्यात आले.’ या प्रकरणी मंचर पोलिसांनी १७ मे रोजी जावेदला अटक केली. २०१९ च्या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.