ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी होताच गेस्ट्रॉऐवजी मलेरियाने डोके काढले वर

आठवड्याभरात साचलेल्या पाण्यातून मच्छरांमुळे होणाऱ्या आजार वाढल्याची नोंद आरोग्य विभागाने दिली

133
ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी होताच गेस्ट्रॉऐवजी मलेरियाने डोके काढले वर
ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी होताच गेस्ट्रॉऐवजी मलेरियाने डोके काढले वर

ऑगस्ट महिन्यात आठवडाभर संततधार पाऊस गायब आहे. या आठवड्याभरात साचलेल्या पाण्यातून मच्छरांमुळे होणाऱ्या आजार वाढल्याची नोंद आरोग्य विभागाने दिली. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यानुसार, मलेरियाचे रुग्ण वाढल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली. आठवड्याभरात मलेरियाचे २२६ रुग्ण सापडल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली. त्याखालोखाल गेस्ट्रॉचे २०३ रुग्ण सापडले. डेंग्यूचेही १५७ रुग्ण आढळून आले. मात्र, लेप्टोचे ७५ रुग्ण सापडल्याने पालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली.

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत डेंग्यू, लेप्टो आणि गेस्ट्रॉच्या रुग्णात वाढ दिसून आली होती. जुलै महिन्यात मुंबईत सरासरीपेक्षाही जास्त पाऊस झाला होता, त्यामुळे जलजन्य आजारात वाढ झाली. गेस्ट्रॉचे जुलै महिन्यात १ हजार ६४९ रुग्ण सापडल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली होती. मलेरियाचे ७२१, डेंग्यूचे ५७९, लेप्टोचे ३७७ तर हेपेटाइटिसच्या रुग्णांची संख्या १३८ पर्यंत नोंदवली गेली.

मुंबईत साचलेल्या पाण्याच्या नजीकच्या रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाऊन पोटाची बाधा झालेले रुग्ण वाढत असल्याचेही निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. अँटीबायोटिक्सचा पूर्ण कोर्स करूनही काही रुग्णांना पटकन आराम मिळत नसल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली. सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. सांधेदुखी डेंग्यूचे लक्षण असू शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. मलेरियाच्या तुलनेत डेंग्यू जास्त घातक आजार मानला जातो, त्यामुळे डेंग्यूच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

(हेही वाचा – Organ Donation : नागरिक जागृत, सलग दोन दिवसांत १२ अवयवदान)

काय काळजी घ्याल – 

  • रस्त्यावरचे उघडे अन्नपदार्थ खाऊ नका.
  • साचलेल्या पाण्याजवळच्या नागरी वसाहतीतील माणसांनी आरोग्याची आवश्यक काळजी घ्या.
  • रस्त्यावर साचलेल्या पाण्यात शक्यतो जाऊ नका.
  • पावसात घराबाहेर पडण्यापूर्वी पायाला जखम असल्यास बाहेर जाणे टाळा किंवा मलमपट्टी लावून बाहेर पडा.
  • घराबाहेर छप्परावर साचलेले पाणी स्वच्छ करा.
  • घरातील भांडी तसेच झाडाच्या कुंडयात साचलेले पाणी सतत बदलत रहा.
  • पाणी उकळून प्या.
  • तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस पोटदुखी असल्यास तातडीने डॉक्टरांना संपर्क साधा.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.