Makar Sankranti: नवीन वर्षातील पहिला सण ‘मकर संक्रांत’, वाचा ‘या’ दिवसाचे महत्त्व

मकर संक्रांतीनंतर नद्यांमध्ये बाष्पीभवनाची प्रक्रिया सुरू होते, ज्यामुळे शरीरातील अनेक रोग दूर होतात. या ऋतूत तीळ आणि गूळ खाणे खूप फायदेशीर आहे, त्यामुळे शरीर उबदार राहते.

220
Makar Sankranti: नवीन वर्षातील पहिला सण 'मकर संक्रांत', वाचा 'या' दिवसाचे महत्त्व
Makar Sankranti: नवीन वर्षातील पहिला सण 'मकर संक्रांत', वाचा 'या' दिवसाचे महत्त्व

भारतीय संस्कृतीत मकरसंक्रांत (Makar Sankranti) हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी तीळगुळाचे वाटप करून प्रेमाची देवाण-घेवाण केली जाते.

मकरसंक्रातीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या उत्सवाला ‘संक्रांत’ असे म्हणतात. कर्क संक्रांतीनंतर सूर्य दक्षिणेकडे जातो आणि पृथ्वी सूर्याच्या जवळ, म्हणजे खाली जाते. यालाच ‘दक्षिणायन’ असे म्हणतात. मकरसंक्रांतीनंतर सूर्य उत्तरेकडे जातो आणि पृथ्वी सूर्यापासून दूर, म्हणजे वर जाते. यालाच ‘उत्तरायण’ असे म्हणतात. मकरसंक्रांत म्हणजे खालून वर चढण्याचा उत्सव, असे या दिवसाचे महत्त्व आहे. या दिवशी तिळगूळ वाटण्याची प्रथा आहे. मकर संक्रांतीनिमित्त सवाष्ण स्त्रिया हळदीकुंकूही करतात. एकमेकांना तिळगूळ देऊन ‘तिळगूळ घ्या गोड गोड बोला’ असे म्हणून परस्परातील हेवेदावे विसरून गुण्यागोविंदाने नांदायला शिकवणारा हा सण आहे.

नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांत हा हिंदू धर्माचा प्रमुख सण मानला जातो. २०२४  मध्ये मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) सण १५ जानेवारीला साजरा केला जाणार आहे. ग्रहांचा राजा सूर्य १४ जानेवारी २०२४ रोजी मध्यरात्री ०२:४२ वाजता मकर राशीत प्रवेश करेल. १५ जानेवारीला उदया तिथी येत आहे, त्यामुळे १५  जानेवारी २०२४ रोजी मकर संक्रांती साजरी होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून मकर संक्रांतीचा सण  १५ जानेवारीलाच साजरा केला जात आहे.

वरियान योग
ज्योतिषींनी सांगितल्याप्रमाणे, २०२४ मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी १५ जानेवारीला रवि योग, शतभिषा नक्षत्रात तयार जाईल. या दिवशी वरियान योग देखील दिवसभर राहील. सकाळी ७:१५ ते ८:0७ पर्यंत रवि योग असेल.

(हेही वाचा – Foreign Cigarette : न्हावा शेवा बंदरातून 10.08 कोटी रुपयांच्या परदेशी सिगारेटचा कंटेनर पकडला)

तिळगुळाचे महत्त्व
तिळामध्ये सत्त्वलहरींचे (सकारत्मक ऊर्जा ) ग्रहण अन् प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असल्यामुळे तीळगुळाचे सेवन केल्याने अंतर्शुद्धी होते. या दिवशी महादेवाला तीळ-तांदूळ अर्पण करण्याचे अथवा तीळतांदूळ मिश्रित अर्घ्य अर्पण करण्याचेही विधान आहे. या पर्वाच्या दिवशी तिळाचे विशेष महत्त्व मानले गेले आहे. तिळाचे उटणे, तीळमिश्रित पाण्याचे स्नान, तीळमिश्रित पाणी पिणे, तिळाचे हवन करणे, स्वयंपाकात तिळाचा वापर, तसेच तिळाचे दान हे पूर्वीपासून महत्वाचे मानले जाते.या कृती केल्याने पापक्षालन होते.म्हणून या दिवशी तीळ, गूळ, तसेच साखरमिश्रित लाडू खाण्याचे, एकमेकांना देण्याचे तसेच दान करण्याचे अपार महत्त्व आहे.

किंक्रांत अथवा करिदिन…
‘मकरसंक्रांतीला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ असतो. या काळात तीर्थस्नानाला विशेष महत्त्व आहे. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या नद्यांच्या काठी असलेल्या क्षेत्रावर स्नान करणार्‍यास महापुण्य लाभते.’ संक्रांतीच्या दुसर्‍या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते.या दिवशी देवीने किंकरासुराला ठार मारले.

दानाचे महत्त्व
मकरसंक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो. या पर्वकाळी केलेले दान आणि पुण्यकर्मे विशेष फलद्रूप होतात. धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान, जप, तप तसेच धार्मिक अनुष्ठानाला अत्यंत महत्त्व आहे.

आरोग्यदायी कारणे…
मकर संक्रांत हा सण ‘काईट फेस्टिव्हल’ म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी लोक गच्चीवर उभे राहून पतंग उडवतात. मात्र, पतंग उडवण्यामागे काही तास सूर्यप्रकाशात घालवणे हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. या थंडीच्या मोसमात सूर्यप्रकाश शरीरासाठी आरोग्यदायी, त्वचा आणि हाडांसाठी खूप फायदेशीर असतो.

शास्त्रज्ञांचे मत…
ज्योतिषींनी सांगितल्याप्रमाणे, मकर संक्रांतीनंतर नद्यांमध्ये बाष्पीभवनाची प्रक्रिया सुरू होते, ज्यामुळे शरीरातील अनेक रोग दूर होतात. या ऋतूत तीळ आणि गूळ खाणे खूप फायदेशीर आहे, त्यामुळे शरीर उबदार राहते. सूर्याच्या उष्णतेमुळे उत्तरायणात थंडी कमी होते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. १५ जानेवारी हा दिवस मकर संक्रांतीने थंडी कमी होण्याची सुरुवात मानली जाते.

 

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.