पुलवामा: ‘आयईडी’सह दहशतवाद्याला अटक; पोलिसांनी उधळून लावला घातपाताचा कट

152

जम्मू-काश्मिरात होऊ घातलेल्या जी-२० बैठकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दक्षिण काश्मिरातील पुलवामा येथे शोध मोहिमेदरम्यान पोलिसांनी ६ किलो आयईडीसह एका दहशतवाद्याला अटक केली आहे. इश्फाक अहमद वानी असे या दहशतवाद्याचे नाव आहे.

(हेही वाचा – ‘The Kerala Story’ चित्रपटाला विरोध करणारे पक्ष दहशतवादाला समर्थन करतात – अनुराग ठाकूर)

यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार, दक्षिण काश्मिरच्या पुलवामा येथे एका दहशतवाद्याला ६ किलो इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईससह (आयईडी) अटक करण्यात आली आहे. त्यामुळे घातपाताचा मोठा कट उधळून लावल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. शोध मोहिमेदरम्यान पोलिसांनी अरिगाम भागातून इश्फाक अहमद वानी याला ६ किलो पूर्वनिर्मित आयईडीसह अटक केली. राज्यात होणाऱ्या जी-२० बैठकीपूर्वी सुरक्षा दलांच्या वाहनांवर हल्ला करण्यासाठी या आयईडीचा वापर केला जाणार होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.