Maharashtra Seva Sangha: महाराष्ट्र सेवा संघातर्फे ‘किल्ले प्रतिकृती बांधणी स्पर्धा – २०२३’चे आयोजन

प्रत्येक विभागामध्ये ही स्पर्धा २ गटांमध्ये घेण्यात आली होती.

104
Maharashtra Seva Sangha: महाराष्ट्र सेवा संघातर्फे 'किल्ले प्रतिकृती बांधणी स्पर्धा - २०२३'चे आयोजन
Maharashtra Seva Sangha: महाराष्ट्र सेवा संघातर्फे 'किल्ले प्रतिकृती बांधणी स्पर्धा - २०२३'चे आयोजन

महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड संस्थेच्या गिरिमित्र विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील ‘किल्ले प्रतिकृती बांधणी स्पर्धा – २०२३’ घेण्यात आली होती. यंदा ही स्पर्धा फक्त मुलुंड-भांडुप परिसराकरिता मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रभर ४ विभाग बनवून घेण्यात आली.

या स्पर्धेत मुलुंड आणि भांडुप, ठाणे व नवी-मुंबई, मुंबई शहर व उपनगर ते थेट उर्वरित महाराष्ट्र विभागांमधून स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. चारही विभाग मिळून जवळपास ११५ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सहभागी संघांमधून १,००० पेक्षा जास्त लहान-मोठे स्पर्धक या उपक्रमात सामील झाले होते.

(हेही वाचा – Pakistan : अणुयुद्धात सगळा हिंदू धर्म संपेल, मुसलमान नाही; कारण जगभरात ५७ मुस्लिम राष्ट्रे; पाकच्या संरक्षण तज्ज्ञाने तोडले अकलेचे तारे )

एकूण ११५ स्पर्धकांच्या किल्ल्याचे परीक्षण परीक्षकांनी स्वतः भेट देऊन तसेच अभिनव गुगल ड्राईव्हवरील फोटो आणि व्हिडियोच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. मुलुंड व भांडुप विभागाचे परीक्षण अपर्णा भट्टे (अनुभवी वास्तुविशारद व गिर्यारोहक), धनंजय मदन (ज्येष्ठ सायकलिस्ट) आणि पराग लिमये (इतिहास अभ्यासक व गिर्यारोहक) यांनी केले होते. “ठाणे व नवी-मुंबई” विभागाचे परीक्षण राजन बागवे (अनुभवी वास्तुविशारद व गिर्यारोहक), डॉ. अमर अडके (इतिहास अभ्यासक व गिर्यारोहक) आणि अतुल गुरु (महाराष्ट्र राज्य दुर्ग संवर्धन समिती सदस्य व गिर्यारोहक) यांनी केले होते. मुंबई शहर व उपनगर विभागाचे परीक्षण प्रवीण कदम (महाराष्ट्र राज्य दुर्ग संवर्धन समिती सदस्य व इतिहास अभ्यासक), श्रीकांत कासट (इतिहास अभ्यासक, लेखक व गिर्यारोहक), शेखर राजेशिर्के (प्रसिद्ध छायाचित्रकार, फिल्म मेकर व गिर्यारोहक) यांनी केले होते. उर्वरित महाराष्ट्र विभागाचे परीक्षण अमित सामंत (किल्ले – इतिहास अभ्यासक व गिर्यारोहक), महेंद्र गोवेकर (लेखक – नकाशातून दुर्गभ्रमंती व गिर्यारोहक) आणि संजय तळेकर (प्रसिद्ध आर्टिस्ट, किल्ले मॉडेल मेकर व गिर्यारोहक) यांनी केले होते.

किल्ले बांधणी कार्यशाळा

प्रत्येक विभागामध्ये ही स्पर्धा २ गटांमध्ये घेण्यात आली होती. इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे जुनिअर गट व दहावीच्या पुढील सिनियर किंवा खुला गट किल्ला म्हणजे काय, किल्ल्यांचे प्रकार, त्यावर कोणत्या वास्तू असतात, किल्ल्याचा भौगोलिक अभ्यास व ऐतिहासिक महत्त्व, किल्ला प्रतिकृती बनवतांना काय करावे व काय करू नये, सोप्या पद्धतीने जवळ मिळणाऱ्या साहित्यांच्या आधारे किल्ला कसा बनवावा, किल्ला ईकोफ्रेंड्ली कसा बनवावा, इत्यादींवर आधारित “किल्ले बांधणी कार्यशाळा” सर्व स्पर्धकांसाठी घेण्यात आली होती. या कार्यशाळेत नागपूर येथील प्रसिद्ध किल्ले मॉडेल मेकर अतुल गुरु आणि त्यांच्या टीमने प्रत्यक्ष काही किल्ल्यांचे मॉडेल्स बनवून सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र राज्यभर स्पर्धा…

स्पर्धा आयोजनाच्या आखणीमध्ये हृषिकेश यादव (अध्यक्ष – गिरिमित्र विभाग / महाराष्ट्राच्या पहिल्या यशस्वी नागरी एव्हरेस्ट मोहिमेचे नेते) आणि किरण देशमुख (कार्यवाह – गिरिमित्र विभाग व ज्येष्ठ गिर्यारोहक) ह्यांचे महत्त्वाचे योगदान होते. यावर्षी ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर स्पर्धा घेतल्यामुळे प्रत्येक विभागातून बऱ्याच संघांच्या प्रवेशिका आल्या होत्या. स्पर्धेचे नियोजनाकरिता डेटा एन्ट्री व ऍडमिन कार्य हे मोहित तांडेल (सदस्य, महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड) यांनी केले.

स्पर्धकांनी पुस्तके व गुगलच्या आधारे किल्ल्यांबद्दल माहिती अभ्यासली होती. त्यातील काहींनी प्रत्यक्ष किल्ल्याला भेट देऊन, किल्ल्याचा भौगोलिक अभ्यास करून, त्यावरील वास्तूंचे छायाचित्र टिपून किल्ला बनवला होता. किल्ले परीक्षणाच्या वेळी बऱ्याच स्पर्धकांनी किल्ल्याच्या माहितीसोबतच छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा त्या किल्ल्यासंबंधित असलेला इतिहास आवर्जून सांगितला. बर्‍याच स्पर्धकांनी वेगळे किल्ले निवडले होते. स्पर्धकांनी बनवलेल्या किल्ले प्रतिकृतींची भौगोलिक रचनेत समानता, वास्तूंचे डिटेलिंग आणि सादर केलेल्या किल्ल्या संबंधितचा इतिहास – माहितीच्या निकषांवरून निकाल जाहीर करण्यात आला.

महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड, गिरीमित्र विभाग आयोजित किल्ले बांधणी स्पर्धा २०२३ चे निकाल पुढील प्रमाणे आहे- 

“मुलुंड व भांडुप” विभाग

जुनिअर गट
प्रथम क्रमांक – F. C. फ्रेंड्स, फ्रेंड्स कॉलोनी, भांडुप (पूर्व) – तोरणा किल्ला
द्वितीय क्रमांक – आम्ही मावळे ग्रुप, नवघर प्रथम लेन, मुलुंड (पूर्व) – पुरंदर किल्ला
तृतीय क्रमांक – डेस्टिनी प्राईड जुनिअर किंग, गवाणपाडा, मुलुंड (पूर्व) – सिंधुदुर्ग किल्ला
उत्तेजनार्थ – रुल ब्रेकर्स, लक्ष्मी नगर, म्हाडा कॉलोनी, मुलुंड (पूर्व) – प्रतापगड किल्ला
परीक्षकांकडून कौतुक – कळमकर, श्रमसाफल्य सोसायटी, मुलुंड (पूर्व) – सज्जनगड किल्ला

सिनियर गट
प्रथम क्रमांक – आझाद स्पोर्ट्स क्लब, केनी रोड, भांडुप (पूर्व) – रायगड किल्ला
द्वितीय क्रमांक – गवनीचा गोविंदा पथक, गवनीपाडा, सर्वोदया, मुलुंड (पश्चिम) – पुरंदर किल्ला
तृतीय क्रमांक – बिनधास्त बॉईज, फ्रेंड्स कॉलोनी, भांडुप (पूर्व) – विजयदुर्ग किल्ला
उत्तेजनार्थ – जीवन आनंद सोसायटी, उत्कर्ष नगर, भांडुप (पश्चिम) – मल्हारगड किल्ला
उत्तेजनार्थ – मॅपल सोसायटी, रुणवाल ग्रीन्स, मुलुंड (पश्चिम) – रायगड शिवराज्याभिषेक
उत्तेजनार्थ – श्री गणेश मित्र मंडळ, क्रांती नगर, भांडुप (पश्चिम) – सिंधुदुर्ग किल्ला

‘ठाणे व नवी-मुंबई’ विभाग

जुनिअर गट
प्रथम क्रमांक – नेताजी सुभाष चंद्र बोस, सेक्टर-१६, ऐरोली (नवी-मुंबई) – प्रतापगड किल्ला
द्वितीय क्रमांक – शिव छावा मित्र मंडळ, भवानी चौक, विटावा (ठाणे) – मुरुड जंजिरा किल्ला
तृतीय क्रमांक – किशोर पार्कचे मावळे, पारसिक नगर, कळवा (ठाणे) – सिंधुदुर्ग किल्ला
उत्तेजनार्थ – जय भवानी मर्दानी खेळ पथक, सेक्टर-९, ऐरोली (नवी-मुंबई) – शिवनेरी किल्ला

सिनियर गट
प्रथम क्रमांक – अरुण निवास मित्र मंडळ, जुनी डोंबिवली, डोंबिवली (पश्चिम) – देवगिरी किल्ला
द्वितीय क्रमांक – मनोरमा नगर मित्र मंडळ, बदलापूर कर्जत रोड, बदलापूर (पूर्व) – पद्मदुर्ग किल्ला
तृतीय क्रमांक – M. B. बॉईज, सत्यवान चौक, देवीचा पाडा, डोंबिवली (पश्चिम) – धारूर किल्ला
उत्तेजनार्थ – श्री साईनाथ मित्र मंडळ, जुनी डोंबिवली, डोंबिवली (पश्चिम) – रायगड किल्ला
उत्तेजनार्थ – ओंकार मित्र मंडळ, पोखरण रोड क्र. १, खोपट, ठाणे (पश्चिम) – प्रतापगड किल्ला
उत्तेजनार्थ – अम्मू मित्र मंडळ, सिंडिकेट, अम्मू नगर, कल्याण (पश्चिम) – रायगड किल्ला
उत्तेजनार्थ – रघुनाथ विहराचे शिलेदार, सेक्टर-१४, खारघर (नवी-मुंबई) – राजगड किल्ला

‘मुंबई शहर व उप-नगर’ विभाग

जुनिअर गट
प्रथम क्रमांक – आम्ही मावळे, कोहिनूर मिल कंपाऊंड, नायगाव (दादर) – लोहगड किल्ला
द्वितीय क्रमांक – डंकिन ग्रुप, मेघवाडी, डॉ. S. S. Rao रोड, लालबाग (मुंबई) – रांगणा किल्ला
तृतीय क्रमांक – कालेवाडी ७ स्टार, कालाचौकी, आंबेडकर रोड, परेल (मुंबई) – सिंहगड किल्ला

सिनियर गट
प्रथम क्रमांक – चिंतामणी क्रीडा मंडळ, छ. संभाजी नगर, सहार रोड, अंधेरी (मुंबई) – रायगड किल्ला
द्वितीय क्रमांक – बाळ गोपाळ मित्र मंडळ, बांद्रेकर वाडी, जोगेश्वरी (मुंबई) – पन्हाळगड पावनखिंड विशाळगड
तृतीय क्रमांक – M. Y. S. ग्रुप, मातोश्री गृहनिर्माण संस्था, चारकोप सेक्टर १, कांदिवली (मुंबई) – प्रतापगड किल्ला

‘उर्वरित महाराष्ट्र” विभाग

जुनिअर गट
प्रथम क्रमांक – पार्थ गांगेले, छ. शिवाजी नगर, वाघदर्डी रोड, मनमाड (नाशिक) – देवगिरी किल्ला
द्वितीय क्रमांक – वर्धमान बाल मित्र मंडळ, वर्धमान विहार, भाणवट रोड, खोपोली (रायगड) – राजगड किल्ला
तृतीय क्रमांक – Essence International School, गजानन महाराज मंदिर जवळ, नागलवाडी, नागपूर – पद्मदुर्ग किल्ला

सिनियर गट
प्रथम क्रमांक – विश्वकर्मा मित्र मंडळ, आंबावडे बँक, पोस्ट आंबावडे बुद्रुक, तालुका जिल्हा सातारा – रायगड किल्ला
द्वितीय क्रमांक – शिवबा युवा मित्र मंडळ, संयुक्त नगर, नालासोपारा (पूर्व), जिल्हा पालघर – रायगड किल्ला
तृतीय क्रमांक – साई सुयोग CHS, भूई समेलपाडा, नालासोपारा (पश्चिम), जिल्हा पालघर – कांचना मंचना किल्ला
उत्तेजनार्थ – वैभव दुर्ग प्रतिष्ठान, सुभाष रोड, खोब्रागडे हॉस्पिटलच्या मागे, गणेश पेठ, नागपूर – शिवनेरी किल्ला

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.