वय उलटले तरी यापुढे पोलीस भरतीत संधी

102

राज्य सरकारने पोलीस भरतीतील वयोमर्यादेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने पोलीस भरतीच्या कमाल वयोमर्यादेत वाढ केली आहे. यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या तरुण- तरुणींना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या काळात 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत ज्या उमेदवारांची वयाची कमाल मर्यादा पूर्ण झाली, अशा सर्व प्रवर्गातील उमेदवारांना या निर्णयामुळे एक संधी मिळणार आहे. 2020 आणि 21 या वर्षात रिक्त पदे भरण्यासाठीच्या भरती प्रक्रियेसाठी एकवेळची उपाययोजना म्हणून हे उमेदवार पात्र असतील. शुक्रवारी गृहविभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहे.

( हेही वाचा: मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याला लाच घेताना अटक! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.