Maharashtra Military School : महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे प्राचार्य काशिनाथ भोईर यांना ‘गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ प्रदान

मुख्याध्यापक महामंडळाकडून दिला जाणारा 'गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार' हा राज्यातील व शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. विशेष म्हणजे मागील वर्षीच प्राचार्य काशिनाथ भोईर यांना मेस्टाचा 'एक्स्लंट प्रिंन्सिपॉल अवार्ड' मिळाला आहे.

97
Maharashtra Military School : महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे प्राचार्य काशिनाथ भोईर यांना ‘गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार' प्रदान
Maharashtra Military School : महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे प्राचार्य काशिनाथ भोईर यांना ‘गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार' प्रदान

महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे प्राचार्य काशिनाथ भोईर (Kashinath Bhoir) यांना या वर्षीचा राज्यस्तरीय ‘गुणवंत मुख्याध्यापक’ पुरस्कार मिळाला आहे. (Maharashtra Military School) रविवार, 19 नोव्हेंबर रोजी फैजपूर, जळगाव येथे भरलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, मुंबई महामंडळाच्या वार्षिक अधिवेशनात सदर पुरस्कार शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

(हेही वाचा – PM Narendra Modi : काँग्रेसवाले एकमेकांनाच रन आउट करतात; राजस्थानच्या सभेत पंतप्रधान मोदींची तुफान फटकेबाजी)

या वेळी ‘मुख्याध्यापक महामंडळ मुंबई’चे अध्यक्ष जे. के. पाटील, सचिव शांताराम पोखरकर, आमदार शिरीषदादा चौधरी आणि महामंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन जळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी फैजपूर येथे भरले होते. अधिवेशनास राज्यातून एक हजार मुख्याध्यापक उपस्थित होते. तत्पूर्वी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अधिवेशनातील उपस्थित मुख्याध्यापकांना संबोधित केले. (Maharashtra Military School)

या अधिवेशनात राज्यातील काही निवडक मुख्याध्यापकांचा ‘गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ ही महाराष्ट्र राज्यातील शिक्षण क्षेत्रातील शाळा, शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी काम करणारी एक अग्रगण्य महामंडळ संघटना आहे. मुख्याध्यापक महामंडळाकडून दिला जाणारा ‘गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ हा राज्यातील व शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. विशेष म्हणजे मागील वर्षीच त्यांना मेस्टाचा ‘एक्स्लंट प्रिंन्सिपॉल अवार्ड’ मिळाला आहे. (Maharashtra Military School)

(हेही वाचा – World Cup 2023 Final Ind vs Aus : ८१ धावांत भारताचे तीन गडी बाद)

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे प्राचार्य काशिनाथ भोईर यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, संचालक रणजित सावरकर, सर्व शिक्षक, कर्मचारी आणि सर्व पालक वर्ग यांनी प्राचार्य भोईर यांचे अभिनंदन केले आहे. (Maharashtra Military School)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.