BARC : बीएआरसी कॉटर्स मध्ये विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक लैगिंग अत्याचार 

62
BARC : बीएआरसी कॉटर्स मध्ये विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक लैगिंग अत्याचार 
BARC : बीएआरसी कॉटर्स मध्ये विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक लैगिंग अत्याचार 
चेंबूर येथे असणाऱ्या भाभा अणुशक्ती केंद्र (BARC) वसाहतीत दोन दिवसांपूर्वी संतापजनक प्रकार घडला आहे. वडिलांकडे राहण्यास आलेल्या १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थीनीला शितपेयात गुंगीचे औषध देऊन दोन जणांनी सामूहिक लैगिंग अत्याचार केला आहे. या घटनेने पूर्व उपनगरात खळबळ उडवून दिली आहे. चेंबूर पोलिसांनी या प्रकरणी दोन विद्यार्थ्यांवर सामूहिक अत्याचार, गुंगीचे औषध दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

चेंबूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थ्यांनी ही आई आणि बहिणीसोबत पालघर जिल्ह्यातील भोईसर येथे राहण्यास आहे. पीडितेचे वडील भाभा अणुशक्ती केंद्रात (BARC) (बीएआरसी) कामाला असून ते चेंबूर पोस्टल कॉलनी येथील बीएआरसी वसाहत मध्ये एकटेच राहण्यास आहे. पीडिता ही दिवाळीच्या सुट्टीत वडिलांकडे राहण्यास आली होती, त्याच परिसरात तिचा २६ वर्षीय मित्र राहण्यास आहे.

(हेही वाचा-Golden Jackal: सांगलीतील ऊस कामगारांच्या वसाहतीत शिरला सोनेरी कोल्हा)

१६ नोव्हेंबर रोजी रात्री पीडिता स्वयंपाकासाठी लागणाऱ्या काही वस्तू घेण्यासाठी मित्राच्या घरी गेली होती, मित्राचे कुटुंब बाहेर गेल्यामुळे पीडितेचा मित्र आणि आणखी एक जण असे दोघेजण घरी होते. मित्राने पीडितेला घरात बोलावून तीला शीतपेय दिले, शीतपेय प्यायल्यानंतर पीडितेची शुद्ध हरपली. रात्री १ वाजण्याच्या सुमारास पीडिता शुद्धीवर आल्यावर तिच्यावर अतीप्रसंग झाल्याचे तीच्या लक्षात आले.

या प्रसंगामुळे घाबरलेली पीडिता त्याच अवस्थेत आपल्या घरी आली, व दुसऱ्या दिवशी तीने तिच्यावर झालेल्या प्रसंगाबाबत त्याच इमारतीत राहणाऱ्या मैत्रिणींना दिली, मैत्रीनीने तीला पोलिस तक्रार करण्याचा सल्ला दिला. पीडितेने चेंबूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तीच्या सोबत घडलेला सर्व प्रसंग तीने पोलिसांना सांगितला. चेंबूर पोलिसांनी तात्काळ दोन जणांविरुद्ध भा.द.वि.कलम ३७६ (लैगिंग अत्याचार), ३७६ (डी) (सामूहिक लैगिंग अत्याचार), ३२८ (गुंगीचे ओषध देऊन दुखापत करणे), ३४ (सामान्य हेतू) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दोघांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघाना २० नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=jdLquVvz0dc&t=22s

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.