Maharashtra Government : आता ‘या’ रेशन कार्डधारक महिलांना मिळणार मोफत साडी

159
Maharashtra Government : आता ‘या’ रेशन कार्डधारक महिलांना मिळणार मोफत साडी

राज्यातील अंत्योदय रेशन कार्डधारक (पिवळं रेशनकार्ड) कुटुंबातील महिलांना शासनाच्या (Maharashtra Government) माध्यमातून आता दरवर्षी एक साडी भेट म्हणून दिली जाणार आहे.

महिलांना ही साडी (Maharashtra Government) मोफत मिळणार असून साडीचे वितरण रेशन दुकानदारांच्या माध्यमातूनच केले जाणार आहे. म्हणजेच आता रेशन दुकानावर फक्त अन्नधान्यच मिळणार नसून अन्नधान्यासोबतच साडीचे देखील वितरण होणार आहे. राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवली जाणार आहे.

या योजनेची विशेष बाब अशी की, या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या साडीचे (Maharashtra Government) वितरण एका विशिष्ट सणाच्या दिवशी केले जाणार आहे. राज्य शासन ज्या सणाच्या दिवशी साडीचे वितरण करण्यास सांगेल त्या सणाला अंत्योदय कुटुंबातील महिलांना साडीचे वाटप केले जाणार आहे.

(हेही वाचा – Mumbra Thane Shivsena : ठाण्यात राजकारण तापले; उद्धव ठाकरे ‘या’ शाखेची करणार पाहणी)

ही योजना राज्यातील राज्य यंत्रमाग महामंडळ (Maharashtra Government) यांच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. महामंडळ यासाठी 355 रुपयाप्रमाणे साडीची खरेदी करणार आहे. 2023-24 या वर्षासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येकी 355 प्रमाणे साडीची खरेदी होणार आहे. तथापि महामंडळाला हा सारा खर्च राज्य शासनाच्या माध्यमातून पुरवला जाणार आहे.

या योजनेसाठी (Maharashtra Government) साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमाली यांसाठी येणारा खर्च महामंडळाला राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Air Tickets Refund : कोरोना काळातील रद्द विमान तिकीटांचा परतावा मिळणार)

५ वर्षांसाठी वस्त्रोद्योग विभागाची योजना
  • वस्त्रोद्योग विभागाने (Maharashtra Government) एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार ही योजना २०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आली आहे.
  • राज्यात अंत्योदय शिधापत्रिका- धारक कुटुंबांची संख्या २४ लाख ५८ हजार ७४७ इतकी आहे. या सर्व कुटुंबांना पुढील (Maharashtra Government) पाच वर्षे प्रत्येक वर्षी एक याप्रमाणे साडीचे मोफत वाटप केले जाणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.