Air Tickets Refund : कोरोना काळातील रद्द विमान तिकीटांचा परतावा मिळणार

केंद्र सरकारने ट्रॅव्हल पोर्टला जारी केली नोटीस

95
Air Tickets Refund : कोरोना काळातील रद्द विमान तिकीटांचा परतावा मिळणार

कोरोना काळात रद्द झालेल्या विमान तिकीटांचा लवकरच परतावा (रिफंड) (Air Tickets Refund) मिळणार आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाची ऑनलाइन ट्रॅव्हल एग्रीगेटर्ससोबत झालेल्या बैठकीनंतर केंद्र सरकारने ट्रॅव्हल पोर्टला रद्द तिकीटांच्या परताव्याबाबत नोटीस जारी केली आहे.

देशात कोरोना साथरोगामुळे 25 मार्च 2020 पासून लॉकडाऊन (Air Tickets Refund) लावण्यात आले होते. याकाळात अनेक विमान उड्डाणे रद्द झाली होती. तर काही प्रवाशांनी काही कारणांमुळे तिकीटे रद्द केली होती. अशा ग्राहकांना तेव्हा त्यांच्या तिकीटाची रक्कम परत मिळाली नव्हती. तेव्हापासून त्यांचे पैसे अडकून बसले होते.

(हेही वाचा – India To Get MQ 9B : चीनला टक्कर देण्यासाठी अमेरिकेची भारताला मदत; चर्चेच्या पाचव्या फेरीत काय झाले ?)

सरकारने जारी केली नोटीस

आता अशा प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने (Air Tickets Refund) नुकतीच ऑनलाइन ट्रॅव्हल एग्रीगेटर्ससोबत एक बैठक घेतली आहे. सरकारने ऑनलाइन ट्रॅव्हल एग्रीगेटर्सना पुढील आठवड्यापर्यंत प्रवाशांना त्यांच्या कोविड काळातील रद्द झालेल्या फ्लाइट तिकिटांचे पैसे परत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सरकारने यासंदर्भात नोटीसही जारी केली आहे.

त्यामुळे आता प्रवाशांना लवकरच त्यांच्या रद्द तिकीटांच्या रकमेचा परतावा मिळणार आहे.

(हेही वाचा – Indrayani River Pollution : विषारी फेसामुळे इंद्रायणी नदी प्रदूषित)

ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण होणार

याशिवाय ग्राहकांच्या तक्रारींचे कालबद्ध निराकरण करण्यासाठी लोकपाल स्थापन करण्याबाबतही (Air Tickets Refund) चर्चा करण्यात आली. नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि ग्राहक व्यवहार विभाग हे स्थापित करण्यासाठी समाविष्ट असलेल्या पद्धतींवर संयुक्तपणे काम करू शकतात “, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

ग्राहकांच्या (Air Tickets Refund) तक्रारींचे प्रभावी निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनचे हवाई सेवा पोर्टलशी एकत्रीकरण करण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.