Mahalakshmi Saras 2026 : पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या सूचनेनंतर सोलापूर जिल्ह्यातील ३२ महिला लोकप्रतिनिधींचा पाहणी दौरा

76
सोलापूर जिल्ह्यातील ३२ महिला लोकप्रतिनिधींचा पाहणी दौरा
Mahalakshmi Saras 2026 : पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या सूचनेनंतर सोलापूर जिल्ह्यातील ३२ महिला लोकप्रतिनिधींचा पाहणी दौरा
  • प्रतिनिधी

Mahalakshmi Saras 2026            ​मुंबईत सध्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या ‘महालक्ष्मी सरस २०२६’ प्रदर्शनात सोलापूर जिल्ह्यातील ३२ नगरसेविकांनी नुकतीच भेट देऊन ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाची पाहणी केली. सोलापूरच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, भाजपा जिल्हा अध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि जिल्हा सरचिटणीस सुधा अल्लीमोरे यांच्या नेतृत्वात या महिला लोकप्रतिनिधींनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेटी देत महिला उद्योजकांशी संवाद साधला. या दौऱ्यामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळासह महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात नवी चर्चा सुरू झाली आहे. (Mahalakshmi Saras 2026)

(हेही वाचा – PM Modi WFH Appeal: भारतासह अन्य 70 देशांचाही ‘वर्क फ्रॉम होम’ बाबत मोठा निर्णय; नवीन नियम लागू)

​या भेटीचे वैशिष्ट्य म्हणजे, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष सूचनेवरून हा दौरा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि ग्रामीण उत्पादनांची माहिती घेत असताना या लोकप्रतिनिधींनी महिलांच्या मेहनतीचे आणि आत्मविश्वासाचे तोंडभरून कौतुक केले. केवळ पाहणी न करता, या उद्योगांमागील व्यावसायिक गणित आणि ग्रामीण भागातील महिलांची जिद्द त्यांनी जवळून अनुभवली. (Mahalakshmi Saras 2026)

(हेही वाचा – युद्धजन्य परिस्थितीचा फटका; Kalyan-Dombivli मधील रस्ते दुरुस्ती रखडली)

​”पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या प्रदर्शनाला भेट दिली असून, येथील नाविन्यपूर्ण उपक्रम पाहून आम्हाला मोठी प्रेरणा मिळाली आहे,” अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. या प्रदर्शनातून मिळालेली हीच प्रेरणा आता सोलापूर जिल्ह्यात पोहोचणार असून, जिल्ह्यातील महिला उद्योजकांना अशाच प्रकारचे मोठे व्यासपीठ आणि आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा संकल्प यावेळी लोकप्रतिनिधींनी सोडला. यामुळे भविष्यात सोलापूरच्या ग्रामीण भागातही उद्योजकतेची नवी लाट येण्याची चिन्हे आहेत. (Mahalakshmi Saras 2026)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.